Cricket Buzz»फोटो गॅलरी »महिला खेळाडूने कमाईच्या बाबतीत विराटला टाकलं मागे; आशिया खंडात ठरली 'नंबर 1'महिला खेळाडूने कमाईच्या बाबतीत विराटला टाकलं मागे; आशिया खंडात ठरली 'नंबर 1' By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 4:17 PMOpen in App1 / 6Virat Kohli Naomi Osaka, Top 100 Top 100 highest-paid athletes: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा सध्याच्या घडीला आशिया खंडातील सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेटपटू आहे.2 / 6मात्र नुकत्याच घोषित झालेल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या आशियाई क्रीडापटूमध्ये विराटला एका महिलेने मात दिली आहे.3 / 6स्पोर्टीकोच्या अहवालानुसार, यंदाच्या Top 100 सर्वाधिक कमाई करणाऱ्या क्रीडापटूमध्ये केवळ 2 आशियाई खेळाडूंचा समावेश झाला आहे.4 / 6या यादीवर अमेरिकन आणि युरोपियन खेळाडूंचे वर्चस्व आहे. यादीत विराटला जपानची टेनिसपटू नाओमी ओसाका (Naomi Oskaka) ने मात दिली आहे. विराट कोहली यादीत ६१व्या स्थानी आहे तर नाओमीने २०वा क्रमांक पटकावला आहे.5 / 6२५ वर्षीय नाओमीची वार्षिक कमाई ५३.२ मिलियन डॉलर्स इतकी आहे. त्यातील १.२ मिलियन डॉलर्स हे विविध स्पर्धा जिंकून मिळालेले आहेत. तर तब्बल ५२ मिलियन डॉलर्स ही तिची विविध उत्पादनांच्या जाहीरातींमधील कमाई आहे.6 / 6विराट कोहलीबाबत बोलायचे झाल्यास, त्याची एकूण वार्षिक कमाई ३३ मिलियन डॉलर्स आहे. त्यातील २.९ मिलियन डॉलर्स हे टीम इंडिया आणि RCB कडून मिळाणारे मानधन आहे. तर जाहिरातीच्या उत्पन्नातून विराटने वर्षभरात ३१ मिलियन डॉलर्सची कमाई केली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications