Join us  

फिटनेस फंडा... प्रोटीनयुक्त आहारावर भारतीय खेळाडूंचा भर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 5:31 AM

Open in App
1 / 10

नागपूर : हॉटेल रॅडिसन ब्ल्यू येथील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय खेळाडूंनी हलका आहार घेण्याला पसंती दिली. पारंपरिक वरण आणि भात खाण्याऐवजी त्यांनी प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्यावर भर दिला. यावेळी काही खेळाडूंनी चिकन खाण्याला प्राधान्य दिले, तर दुसरीकडे आपल्या तंदुरुस्तीची विशेष काळजी घेणाऱ्या विराटने वेगन आहार घेतला.

2 / 10

ली मेरेडियनमध्ये थांबलेल्या ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडू दिवसभर निवांत मूडमध्ये होते. अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडूंना भारतीय जेवण पसंत असल्याने त्यांनी या जेवणाचा आस्वाद घेतला.

3 / 10

विराट शूटिंगमध्ये व्यस्त क्रिकेटच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत विराटने सकाळी ७.३० वाजता एका ब्रँडच्या जाहिरातेचे शूटिंग केले. सराव सत्र संध्याकाळी होणार असल्याने सकाळीच शूटिंग पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले होते. जवळपास दोन तास विराटने या ब्रँड शूटिंगमध्ये घालवले.

4 / 10

सीमारेषेजवळच्या भागाचे नुकसान पावसाचा सर्वाधिक फटका सीमारेषेजवळच्या भागाला बसला. कारण खेळपट्टीपासून सीमारेषेकडे मैदानाचा उतार असल्याने पावसाचे पाणी या भागात जास्त साचते. त्यामुळे या भागात चिखल साचला होता. पाय ठेवताच मैदानातून पाणी वर येत होते.

5 / 10

अखेर या भागावर मोठ्या प्रमाणात रेती टाकण्यात आली. मैदानाचा मुख्य भाग मात्र कोरडा करण्यात बऱ्याच अंशी कर्मचाऱ्यांना यश आले. आज जर पाऊन आला नाही तर संपूर्ण मैदान पूर्णपणे सुकलेले असेल.

6 / 10

ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी घेतले मैदानाचे दर्शन सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सराव सत्र रद्द झाल्यानंतरही काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी हॉटेलमध्ये बसून न राहता स्टेडियमवर जाण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे मैदान आणि खेळपट्टीची एकंदर परिस्थिती खेळाडूंनी जाणून घेतली. या खेळाडूंची नावे मात्र कळू शकली नाही.

7 / 10

प्रत्यक्ष मैदानावर जाऊन सरावाची संधी हुकल्यामुळे भारतीय खेळाडूंनी हॉटेल रॅडिसन ब्ल्यू येथे जिममध्ये जात व्यायाम करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक यांनी ट्रेडमिलवर धावण्याचा सराव केला.

8 / 10

तर उपकर्णधार लोकेश राहुल आणि रविचंद्रन अश्विन यांनी वजन उचलण्यावर भर दिला. या खेळाडूंव्यतिरिक्त इतरही भारतीय खेळाडू जिममध्ये होते, तर काही खेळाडूंनी रूममध्ये राहून आराम करण्याला प्राधान्य दिले.

9 / 10

दरम्यान, १७ वर्षांखालील मुलींच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत खेळाडूंना टॉयलेटमध्ये जेवण वाढण्याचा व्हिडीओ व्हायरल जाला होता. त्यावर, टीम इंडियाचा सलामीची फंलदाज शिखर धवनने थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( CM Yogi Adityanath ) यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती.

10 / 10

धवनने कबड्डीपटूंसाठी केलेल्या या ट्विटने नेटिझन्सचे मन जिंकले आणि त्याच्यावर कौतुकाचा वर्षावही होतोय. काहींनी भारताच्या अन्य क्रिकेटपटूंना यावरून लक्ष्य करण्याची संधी सोडली नाही. एकीकडे खेळाडूंच्या फिटनेसची काळजी घेतली जात असताना दुसरीकडे खेळाडूंची अशी उपासमार होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघमुंबईशिखर धवनभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
Open in App