Cricket Buzz»फोटो गॅलरी »गुजरातमध्ये जन्मलेले पाच भाऊ पाकिस्तानचे क्रिकेटपटूगुजरातमध्ये जन्मलेले पाच भाऊ पाकिस्तानचे क्रिकेटपटू By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 10:48 AMOpen in App1 / 7भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजे रणयुध्दच. या दोन्ही देशांचा क्रिकेट इतिहासही तितकाच रोमांचक आहे. पण, तुम्हाला माहित आहे का, भारतात जन्मलेल्या पाच खेळाडूंनी पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. विशेष म्हणजे हे पाचही एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. 2 / 7गुजरातच्या जुनागड येथे या पाच भावंडांचा जन्म झाला. यातील चौघांनी पाकिस्तानचे आंतरराष्ट्रीय सामन्यांत प्रतिनिधित्व केले, तर एकाने स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली. यापैकी तीन भावंडांनी एकाचवेळी पाकिस्तान संघात स्थान मिळवले. वजीर मोहम्मद, हनीफ मोहम्मद, रईस मोहम्मद, मुश्ताक मोहम्मद आणि सादिक मोहम्मद अशी या पाच भावंडांची नावे आहेत. यातील रईसने स्थानिक क्रिकेट सामने खेळले आहेत. 3 / 7या पाच भावांपैकी तिघांचा जन्म हा डिसेंबरमधला. सर्वात मोठा भाऊ वजीरचा जन्म 22 डिसेंबर 1929, रईसचा जन्म 25 डिसेंबर 1932, हनीफचा जन्म 21 डिसेंबर 1934 सालचा. मुश्ताक 22 नोव्हेंबर 1943 मध्ये तर सादिल 3 मे 1945 मध्ये जन्मला. यांचा जन्म हा गुजरातचा, परंतु फाळणीनंतर हे सर्व पाकिस्तानात गेले.4 / 7हनीफ मोहम्मदचे नाव जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये घेतले जाते. 17 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्यांनी 55 सामने खेळले. आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात तिहेरी शतक लगावणारे ते पाकिस्तानचे पहिले फलंदाज होते. हनीफ यांना त्या काळी 'लिटिल मास्टर'ही संबोधले जायचे. 5 / 71952-53ला पाकिस्तानने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौरा केला होता. या मालिकेत हनीफ व वजीर यांना संधी मिळाली होती. पाकिस्तानच्या पहिल्या डावात हनीफने सर्वाधिक 51 धावा केल्या. पाकिस्तानने हा सामना एक डाव व 70 धावांनी जिंकला.6 / 7हनीफच्या अखेरच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात लहान भाऊ सादिकने कसोटीत पदार्पण केले. वजीरने 1952 साली आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली, तर 1959 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा सामना खेळला. त्याच वर्षी मुश्ताकने पदार्पण केले. तसेच सादिकने क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. 7 / 7एकाच सामन्यात तीन भाऊ खेळण्याची ही तिसरीच वेळ ठरली. हनीफने 55 कसोटीत 43.98 च्या सरासरीने 3915 धावा केल्या. वजीरच्या नावावर 20 कसोटीत 801 आणि मुश्ताकच्या नावावर 57 कसोटीत 3643 धावा होत्या. सादिकने 41 कसोटीत 2579 धावा केल्या आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications