'छोटा पॅक बडा धमाका'! यंदाच्या IPL हंगामात हे ५ अनकॅप्ड खेळाडू ठरतील लक्षवेधी, कारण...

आयपीएलच्या मेगा लिलावापासून वैभव सूर्यंवशी हे नाव चर्चेत आहे, त्याच्यासह आणखी काही चेहरे आहेत जे यंदाच्या हंगामात लक्षवेधी ठरतील.

आयपीएलच्या यंदाच्या १८ व्या हंगामात पाच अनकॅप्ड प्लेयर्स असे आहेत जे छोटा पॅक बडा धमाका अशी झलक दाखवून देऊ शकतात.

इथं एक नजर टाकुयात यंदाच्या हंगामातील अशा ५ अनकॅप्ट खेळाडूंवर ज्यांच्यावर खिळलेल्या असतील अनेकांच्या नजरा

राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातील वैभव सूर्यंवशी हा खेळाडू मेगा लिलावापासून चर्चेत आहे. १३ वर्षीय खेळाडूसाठी राजस्थानच्या संघानं १.१० कोटी रुपये मोजले आहेत. त्याला किती सामन्यात संधी मिळणार अन् तो कशी कामगिरी करणार ते पाहण्याजोगे असेल.

चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यातील आंद्र सिद्धार्थ हा देखील एक प्रतिभावंत खेळाडू आहे. तामिळनाडूच्या या खेळाडूसाठी चेन्नईच्या संघानं ३० लाख रुपये मोजले आहेत.

मुंबईकर सूर्यांश शेडगे हा पंजाब किंग्सच्या ताफ्यातून खेळताना दिसणार आहे. अखेरच्या षटकात तुफान फटकेबाजी करण्याची क्षमता असलेल्या खेळाडू श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीत खेळणार असल्यामुळे त्याला अधिकाधिक संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे.

रांचीचा रॉबिन मिंझ हा एक विकेट किपर बॅटर आहे. यंदाच्या हंगामात तो मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून धमाका करताना पाहायला मिळेल. ईशान किशनची तो एक परफेक्ट रिप्लेसमेंट ठरू शकतो.

न्यूझीलंडचा युवा क्रिकेटर बेवॉक जेकॉब्स हा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात असून तोही धमाकेदार खेळी करण्यात माहिर आहे. त्याला किती सामन्यात संधी मिळणार तेही पाहण्याजोगे असेल.

रॉबिन मिंझ हा एक विकेट किपर बॅटर आहेच. पण त्याच्या फलंदाजीत धोनीची झलकही पाहायला मिळते. लिलावात कुणी घेतले नाही तर मी रॉबिनला चेन्नईत घेईन असा शब्द धोनीनं या युवा क्रिकेटरच्या वडिलांना दिला होता. आता तो धोनीविरुद्ध खेळताना दिसेल,