Join us  

Flashback 2022 : विराट कोहली ते ऋतुराज यांच्या विक्रमाने गाजले २०२२ वर्ष; जाणून घ्या टॉप ८ रेकॉर्ड्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 4:25 PM

Open in App
1 / 8

विराट कोहलीचे ७२ वे शतक - विराट कोहलीने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध ८२ धावांची मॅच-विनिंग खेळी खेळली. त्याच्या कारकीर्दितील टॉप ३ सर्वोत्तम इनिंग्समध्ये गणली जाईल. कोहलीने या खेळीत ४ षटकार आणि ६ चौकार मारले होते. कोहलीने यंदाच्या आशिया चषक स्पर्धेमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध ट्वेंटी-२०तील पहिले शतक झळकावले. अनेक दिवसांपासून फॉर्मात नसलेल्या कोहलीसाठी हे वर्ष चांगले गेले. अलीकडेच त्याने बांगलादेशविरुद्ध शतक झळकावले, जे त्याच्या कारकिर्दीतील ७२ वे आंतरराष्ट्रीय शतक ठरले होते. ७२ शतकांसह, कोहली सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आणि रिकी पाँटिंगचा विक्रम मोडला. आता फक्त सचिन तेंडुलकर (१०० शतकं) कोहलीच्या पुढे आहे.

2 / 8

नरेंद्र मोदी स्टेडियमचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये - गुजरातमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम हे जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमपैकी एक आहे. यावर्षी इंडियन प्रीमियर लीगचा अंतिम सामनाही याच मैदानावर खेळवण्यात आला. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये १ लाख ०१, ५६६ प्रेक्षक उपस्थित होते. या उपस्थितीमुळे या स्टेडियमचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले.

3 / 8

ऋतुराज गायकवाडने षटकारांचा विक्रम - ऋतुराज गायकवाडसाठी विजय हजारे ट्रॉफी संस्मरणीय ठरली, येथे त्याने शतकांमागून शतकं झळकावली. यादरम्यान त्याने षटकारांचा विक्रमही केला. ऋतुराज गायकवाडने उत्तर प्रदेशविरुद्ध एका षटकात ७ षटकार मारण्याचा विक्रम केला आणि असे करणारा तो पहिला क्रिकेटर ठरला.

4 / 8

पाकिस्तानने भारताचा विक्रम मोडला - पाकिस्तानने ICC ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. या स्पर्धेत सलामीचा सामना गमावल्यानंतर पाकिस्तान फायनलमध्ये खेळेल असे कोणालाही वाटले नव्हते. उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. हा सामना जिंकून पाकिस्तानने भारताचा विक्रम मोडला. एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक १८ ट्वेंटी-२० सामने जिंकण्याचा विक्रम या संघाच्या नावावर आहे.

5 / 8

ट्वेंटी-२० त १०० सामने खेळणारा विराट कोहली दुसरा भारतीय - आशिया चषकात भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध झाला, विराटसाठी हा सामना ऐतिहासिक ठरला. विराटचा हा १००वा ट्वेंटी-२०सामना होता. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये शंभर सामने खेळणारा विराट हा दुसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला, त्याआधी केवळ रोहित शर्माच अशी कामगिरी करू शकला.

6 / 8

इशान किशनचे ऐतिहासिक द्विशतक - इशान किशनने १० डिसेंबर रोजी बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावले होते. इशान वन डे फॉरमॅटमध्ये द्विशतक झळकावणारा चौथा भारतीय ठरला. त्याच्या आधी रोहित शर्मा, वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांनी या फॉरमॅटमध्ये द्विशतकं झळकावली आहेत. या चार भारतीय खेळाडूंशिवाय ख्रिस गेल, फखर जमान आणि मार्टिन गुप्तील यांनी द्विशतके झळकावली आहेत. कमी चेंडूंत दुहेरी शतक झळकावणारा इशान हा सर्वात तरुण खेळाडू ठरला.

7 / 8

शाकिब अल हसनने ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक डॉट बॉल्सच्या यादीत शाहिद आफ्रिदीला मागे टाकले आहे. तो सर्वाधिक डॉट बॉल टाकणारा गोलंदाज ठरला. याशिवाय वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत त्याने शेन वॉर्नला मागे टाकले आहे.

8 / 8

एका वर्षात सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम - एका वर्षात सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम भारतीय क्रिकेट संघाच्या नावावर आहे. याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता ( ३८ सामने). पण आता भारतीय क्रिकेट संघ या बाबतीत अव्वल आला आहे. आता एका वर्षात सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम भारताच्या नावावर आहे.

टॅग्स :फ्लॅशबॅक 2022विराट कोहलीऋतुराज गायकवाडभारत विरुद्ध पाकिस्तान
Open in App