Join us

भारतीय तरुणींच्या सौंदर्यानं क्लीन बोल्ड झाले 'हे' परदेशी क्रिकेटपटू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 15:33 IST

Open in App
1 / 7

शोएब मलिक आणि सानिया मिर्झा: पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक आणि भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा यांच्या लग्नामुळे एकच खळबळ माजली होती. सानियाचा आधी तिच्या बालपणीच्या मित्रासोबत साखरपुडा झाला होता. मात्र ते नातं मोडत तिनं शोएबशी विवाह केला.

2 / 7

सर व्हिव्हियन रिचर्ड्स आणि निना गुप्ता: व्हिव्हियन रिचर्ड्स विवाहित असताना त्यांची आणि निना गुप्ता यांची भेट झाली. त्यामुळे या दोघांनी विवाह केला नाही. मात्र या दोघांनी कधीही आपलं नातं लपवलं नाही. या दोघांना एक मुलगी आहे. तिचं नाव मसाबा गुप्ता. मसाबा अतिशय प्रख्यात फॅशन डिझायनर आहे.

3 / 7

ग्लेन टर्नर आणि सुखिंदर कौर: न्यूझीलंडच्या संघाकडून खेळणाऱ्या ग्लेन टर्नर आणि सुखविंदर कौर यांनी 1973 मध्ये विवाह केला. सुखविंदर कौर न्यूझीलंडमध्ये सुखी टर्नर नावानं ओळखल्या जातात. न्यूझीलंडच्या राजकारणातल्या त्या महत्त्वाच्या नेत्या आहेत. या दाम्पत्याला दोन अपत्यं आहेत.

4 / 7

झहीर अब्बास आणि रिटा लुथ्रा: पाकिस्तानच्या संघातून खेळणाऱ्या झहीर अब्बास आणि रिटा लुथ्रा यांची भेट इंग्लंडमध्ये झाली. त्यावेळी रिटा इंटिरियर डिझाईनिंगचं शिक्षण घेत होत्या. तर झहीर अब्बास काऊन्टी क्रिकेट खेळत होते. लग्नानंतर रिटा यांनी धर्मांतर केलं. यानंतर त्या समिना अब्बास नावानं ओळखल्या जाऊ लागल्या. हे दोघे सध्या कराचीत वास्तव्यास आहेत.

5 / 7

मुथय्या मुरलीधरन आणि मधीमलार राममूर्ती: कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सर्वाधिक विकेट्स घेणारा, भल्याभल्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवणारा मुरलीधरन चेन्नईत राहणाऱ्या मधीमलारला पाहून क्लिन बोल्ड झाला. मधीमलार राममूर्ती ही नित्या आणि एस. राममूर्ती यांची कन्या आहे.

6 / 7

शॉन टेट आणि माशूम सिंघा: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शॉन टेट आणि भारतीय मॉडेल माशूम 2014 मध्ये विवाहबद्ध झाले. शॉन आणि माशूम काही काळ एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर पॅरिसमध्ये सुट्टी घालवत असताना शॉननं माशूमला प्रपोज केलं. यानंतर हे दोघे मुंबईत विवाह बंधनात अडकले.

7 / 7

मोहसीन खान आणि रिना रॉय: पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहसीन खान भारतीय अभिनेत्री रिना रॉयच्या सौंदर्यानं घायाळ झाला. मोहसीन आणि रिना रॉय यांनी दोन बॉलिवूड चित्रपटात सोबत काम केलं. यानंतर दोघे लग्न बंधनात अडकले. मात्र त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही.

टॅग्स :क्रिकेटरिलेशनशिपदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टसानिया मिर्झा