भारतीय क्रिकेटपटूने आपल्या कार कलेक्शनमध्ये नवीन कारची भर घातली आहे. त्याची किंमत लाखात आहे.
टीम इंडियाचा माजी खेळाडू सुरेश रैनाने आपल्या कार कलेक्शनमध्ये नवीन कारची भर घातली आहे. त्याने 'किया' कंपनीची कार्निव्हल कार खरेदी केली, जी सर्वात लक्झरी लिमोझिन वाहनांपैकी एक आहे.
पांढऱ्या रंगाची कार्निव्हल कार रैनाच्या घरी आली आहे. या कारची किंमत ६३.९० लाख रुपये आहे. पण, नोंदणी आणि इतर खर्चासह ऑन-रोड किंमत ७५ लाखांपर्यंत जाऊ शकते.
या लक्झरी कारमध्ये व्हीआयपी सीट बसवण्यात आल्या आहेत, दोन सनरूफ उपलब्ध आहेत. इमर्जन्सी स्टॉप सिग्नल व्यतिरिक्त, ही कार ऑटोमॅटिक स्लाइडिंग दरवाजासह येते.
खरे तर रैनाच्या कार कलेक्शनमध्ये कार्निव्हल व्यतिरिक्त मिनी कूपर, फोर्ड मस्टँग आणि मर्सिडीज बेंझ जीएलई एसयूव्ही कारदेखील आहेत. या वाहनांची किंमत लाखांपासून ते कोटींच्या घरात आहे.