Join us  

New Zealand : न्यूझीलंड तिन्ही फॉर्मेटमधील सर्वात प्रबळ संघ; England च्या माजी कर्णधाराचं मत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 6:22 PM

Open in App
1 / 12

2019 विश्वचषक उपविजेता, 2020-21 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन आणि 2021 T20 विश्वचषक फायनलमध्ये प्रवेश करत केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने तिन्ही फॉरमॅटमध्ये आपली क्षमता सिद्ध केली आहे.

2 / 12

सध्या न्यूझीलंड हा तिन्ही फॉर्मेटमध्ये सर्वात बलाढ्य संघ आहे, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार माईक आथर्टन यांनी व्यक्त केले. न्यूझीलंडने गेल्या काही वर्षांत आयसीसी स्पर्धांमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे.

3 / 12

2019 च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत, इंग्लंड विरुद्धचा अंतिम सामना टाय झाल्यानंतर आणि सुपर ओव्हर देखील टाय झाल्यानंतर, इंग्लंडला अधिक चौकारांच्या आधारे वर्ल्ड चॅम्पियन घोषित करण्यात आले होते.

4 / 12

टी-20 विश्वचषक फायनलमध्ये न्यूझीलंडने पहिला प्रवेश मिळवल्यानंतर आथर्टनने आपलं मत व्यक्त केलं.. बुधवारी पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने इंग्लंडचा पाच गडी राखून पराभव केला. न्यूझीलंडच्या संघाने तीन वर्षांत तिसऱ्यांदा आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

5 / 12

याशिवाय न्यूझीलंडच्या संघाने भारताचा पराभव करून पहिले जागतिक कसोटी विजेतेपद पटकावले. 'न्यूझीलंडचा संघ खेळाच्या सर्वच फॉर्मेटमध्ये उत्कृष्ट आहे. या संघाने आणखी एका विश्वचषकाच्या अंतिम फेरीत मजल मारली, न्यूझीलंड 2019 मधील विश्वचषक स्पर्धेतील सामना जिंकण्याच्या अगदी जवळ होते, तो जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे विजेते आहेत,' असे आथर्टनने 'स्काय स्पोर्ट्स'ला सांगितले.

6 / 12

सर्वच फॉर्मेटमध्ये न्यूझीलंडची टीम ही सर्वोत्तम आहे हे म्हणावंच लागे. यासाठी त्यांचं अभिनंदन, खेळाडू आणि पैशांबाबत मर्यादा असल्या तरी त्यांची कामगिरी ही उत्तम आहे, असं इंग्लंडचे माजी कर्णधार म्हणाले.

7 / 12

सध्या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडनं इंग्लंडचा पराभव करत अंतिम सामन्यात धडक दिली. न्यूझीलंडनं २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमधील पराभवाचा वचपा काढला. उपांत्य फेरीच्या या सामन्यात नाट्यमय घडामोडी घडल्या. किवींचे दोन प्रमुख फलंदाज अवघ्या १३ धावांवर माघारी परतले, त्यानंतर १६व्या षटकांपर्यंत इंग्लंडनं सामन्यावर मजबूत पकड घेतली होती.

8 / 12

पण, जिमि निशॅमनं १७व्या षटकात ख्रिस जॉर्डनला २६ धावा चोपल्या आणि दडपड कमी केलं. १८व्या षटकात विजयासाठी २० धावा हव्या असताना निशॅम झेलबाद झाला अन् इंग्लंडचे चाहते खूश झाले. पण, अर्धशतकी खेळी करणाऱ्या डॅरील मिचेलनं सामना संपवला.

9 / 12

केन विलियम्सननं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. जेसन रॉयच्या जागी इंग्लंडनं आज सॅम बिलिंगला संधी दिली, परंतु सलामीला जॉनी बेअरस्टो व जॉस बटलर ही जोडी आली. किवी कर्णधार विलियम्सनच्या अफलातून कॅचनं ही जोडी तोडली. सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अॅडम मिल्नेनं किवींना पहिले यश मिळवून दिले, विलियम्सननं मिड ऑफला बेअरस्टोचा ( १३) भन्नाट कॅच घेतला.

10 / 12

मिल्नेनं धक्का दिल्यानंतर इश सोढीनं इंग्लंडचा दुसरा सलामीवीर जॉस बटलरला पायचीत केलं. डेविड मलाननं ३० चेंडूंत ४१ धावा कुटल्या. मोईन अलीनं फटकेबाजीला करतानाला मलानसह तिसऱ्या विकेटसाठी ६३ धावा जोडल्या.

11 / 12

अली व लिएम लिव्हिंगस्टोननं धावांचा वेग वाढवताना चौथ्या विकेटसाठी २३ चेंडूंत ४० धावा कुटल्या. अलीनं ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. अली ३७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ५१ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडनं ४ बाद १६६ धावा केल्या.

12 / 12

न्यूझीलंडनं ५ विकेट व १ षटक राखून सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. मिचेल ४८ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारासह नाबाद ७३ धावा केल्या. किवी प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळणार आहेत.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१न्यूझीलंडइंग्लंड
Open in App