Join us

कुणीतरी येणार गं! लग्न न करताच दिग्गज क्रिकेटपटू दुसऱ्यांदा होणार 'बाबा', मुलगी बहीण होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 18:29 IST

Open in App
1 / 7

इंग्लंडचा दिग्गज खेळाडू स्टुअर्ट ब्रॉड पुन्हा एकदा बाबा होणार आहे. त्याची गर्लफ्रेंड मोली किंग हिने याआधी एका मुलीला जन्म दिला आहे. हे कपल आता दुसऱ्यांदा पालक बनणार आहे.

2 / 7

ब्रॉडने त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती दुसऱ्यांदा बाळाची आई होणार असल्याचे दिसते. यामध्ये त्यांची मुलगी देखील दिसत आहे.

3 / 7

स्टुअर्ट ब्रॉड हा जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. तर मॉली किंग ही एक रेडिओ प्रेझेंटर आहे. दोघांनाही मागील वर्षी लग्न करायचे होते, पण काही कारणास्तव ते पुढे ढकलावे लागले होते.

4 / 7

ब्रॉडची गर्लफ्रेंड मोली किंगने कॅप्शनच्या माध्यमातून म्हटले की, आमची लहान मुलगी लवकरच मोठी बहीण होणार आहे. आम्ही तिला पाहण्यासाठी खूप आतुर आहोत.

5 / 7

मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्टुअर्ट ब्रॉड आणि मॉली किंग २०१२ पासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांनी अद्याप लग्न केले नाही.

6 / 7

ब्रॉडच्या नावावर १२१ वन डे सामन्यांमध्ये १७८ बळींची नोंद आहे, तर ५६ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने ६५ बळी घेतले आहेत. त्याने काही महिन्यांपूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

7 / 7

टॅग्स :स्टुअर्ट ब्रॉडइंग्लंडदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट