Join us

इशान, श्रेयसबाबत BCCI ने योग्यच केलं! सौरव गांगुली संतापला; म्हणाला, किशनने तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 16:03 IST

Open in App
1 / 6

बीसीसीआयने अय्यर आणि किशन यांना वार्षिक रिटेन्शन करारातून वगळले आणि हा खूप मोठा निर्णय आहे. हे दोघेही गेल्या वर्षी भारतात झालेल्या वन डे वर्ल्ड कप मोहिमेत सहभागी झाले होते. किशन नोव्हेंबर २०२३ मध्ये भारताकडून शेवटचा सामना खेळला, तर अय्यर विशाखापट्टणम येथे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा सदस्य होता.

2 / 6

रेव्हस्पोर्ट्सशी बोलताना गांगुली म्हणाला की, किशन आणि अय्यरबाबत बीसीसीआयचा निर्णय योग्य होता. करारबद्ध खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटही खेळणे अपेक्षित आहे. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळावे अशी BCCI ची इच्छा आहे. श्रेयस आणि इशान रणजी करंडकसारख्या प्रमुख स्पर्धे खेळले नाहीत, याचे मला आश्चर्य वाटते. खेळाडूंनी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेच पाहिजे.

3 / 6

''ही दोघं चुकली आहेत. तुम्हाला प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायचे आहे. एकदा तुम्ही करारबद्ध खेळाडू झालात की तुमच्याकडून खेळणे अपेक्षित असते. श्रेयस अय्यर काही दिवसांत उपांत्य फेरीत मुंबईकडून खेळणार आहे,'' असे गांगुली पुढे म्हणाला.

4 / 6

तो पुढे म्हणाला, ''किशनने त्याला आश्चर्यचकित केले आणि त्याला देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळायलाच हवे होते. किशनने दक्षिण आफ्रिकेचा दौरा मध्यावर सोडला आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही तो खेळला नाही. ही तरुण खेळाडू आहेत. इशानच्या वागण्याचं मला आश्चर्य वाटले. भारतीय संघाच्या सर्व फॉरमॅटच्या संघाचे ते सदस्य आहेत आणि त्यांच्याकडे आयपीएलमध्ये मोठं करारही आहे. असं असूनही इशान का खेळला नाही, याचं मला आश्चर्य वाटतंय.''

5 / 6

“तुम्ही खेळलेच पाहिजे, खासकरून जेव्हा तुम्ही इशानसारखे प्रतिभावान असाल. जेव्हा तुम्ही भारताकडून सर्व फॉरमॅटमध्ये खेळत असाल, तेव्हा तुम्ही खेळलेच पाहिजे. होय, बीसीसीआयने कठोर भूमिका घेतली आहे आणि ती योग्यच आहे. जेव्हा तुमच्याशी करार केला जातो तेव्हा तुम्हाला नियमांचे पालन करावे लागते,” असेही गांगुली पुढे म्हणाला.

6 / 6

गांगुली म्हणाला, ''मी खेळत असताना रणजी करंडक ही मुख्य स्पर्धा असायची. ही मुख्य स्पर्धा होती. रणजी ट्रॉफीच्या आधारे माझी राष्ट्रीय संघ निवड झाली. साहजिकच आयपीएल तेव्हा नव्हते. आयपीएल माझ्या कारकिर्दीच्या नंतरच्या टप्प्यावर आली. आमच्या कारकिर्दीत रणजी ही सर्वात महत्त्वाची स्पर्धा होती,”

टॅग्स :इशान किशनबीसीसीआयश्रेयस अय्यरसौरभ गांगुली