भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज वाढदिवस आहे. तो एकमेव असा कर्णधार आहे, ज्याने आयसीसीचे तीन मोठे किताब जिंकले आहेत. धोनीच्या नेतृत्वात भारताने २००७ ट्वेंटी-२० विश्वचषक, २०११ वन डे विश्वचषक आणि २०१३ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.
याशिवाय धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने पाचवेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तर तो अद्याप आयपीएल खेळत आहे.
१५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करणाऱ्या धोनीचा चाहता वर्ग मोठा आहे. संघर्षमय प्रवासातून धोनीने यशाची उंची गाठली.
धोनीच्या जीवनावर आधारित एक चित्रपट देखील आला आहे. दिवंगत अभिनेता सुशात सिंग राजपूतच्या अभिनयातून चाहत्यांनी धोनीचा संघर्ष मोठ्या पडद्यावर पाहिला.
आज धोनीच्या वाढदिवशी त्याचे काही इनसाइड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. धोनी आणि त्याच्या वडिलांचे फार दुर्मिळ फोटो सोशल मीडियावर आहेत.
धोनीचा बहिण जयंती गुप्तासोबतचा एक फोटो चाहत्यांचे लक्ष वेधत आहे, जिचा उल्लेख धोनीचा बायोपिक 'धोनी द अनटोल्ड स्टोरी'मध्ये करण्यात आला आहे.
दरम्यान, धोनीचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याची आई आणि पत्नी साक्षी दिसत आहे.
याशिवाय काही फोटोंमध्ये धोनी त्याच्या मोठ्या भावासोबत दिसत आहे. नरेंद्र सिंग धोनी असे त्याच्या मोठ्या भावाचे नाव आहे.
धोनी सुट्टीमध्ये पत्नी साक्षीसोबत समुद्राच्या ठिकाणी आनंद साजरा करत असल्याचाही दिसत आहे.
धोनी आणि बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा एक जुना फोटो खूप व्हायरल होत आहे.
धोनी मैदानात अभिनेत्याच्या शैलीत असल्याचा क्षण काही चाहत्यांनी टिपला आहे.
धोनीचा बॉलिवूड कलाकारांसोबतचाही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.