Cricket Buzz»फोटो गॅलरी »Mohammad Amir: मॅच फिक्सिंगनंतर जेल अन् वकिलाच्याच पडला 'प्रेमात, पाकिस्तानी खेळाडू 'वादात' NOT OUT!Mohammad Amir: मॅच फिक्सिंगनंतर जेल अन् वकिलाच्याच पडला 'प्रेमात, पाकिस्तानी खेळाडू 'वादात' NOT OUT! By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 5:35 PMOpen in App1 / 10सध्या पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीगचा थरार रंगला आहे. आयपीएलच्या धरतीवर तयार झालेली पीएसएलची स्पर्धा पाकिस्तानातील सर्वात मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेत देशातील आजी माजी खेळाडू 6 फ्रँचायझींमध्ये एकत्र खेळत असतात.2 / 10पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर निवृत्तीनंतर अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे आला आहे. तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये कराची किंग्ज या संघाचा हिस्सा आहे. 3 / 10आपल्या विधानांमुळे चर्चेत असलेला मोहम्मद आमिर अलीकडेच त्याच्या मैदानातील कृत्यामुळे चर्चेत आला आहे. त्याने पीएसएलच्या एका सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमकडे फेकलेल्या चेंडूमुळे वाद रंगला आहे. बाबरने चौकार ठोकल्यानंतर आमिरला राग अनावर झाला, ज्यामुळे त्याला समज देखील देण्यात आली.4 / 10मोहम्मद आमिरची क्रिकेट कारकिर्द वादग्रस्त राहिली. पण या वादाच्या प्रकरणांमुळेच त्याची प्रेमकहाणी सुरू झाली. पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरच्या पत्नीचे नाव नरजीस आमिर आहे. खरं तर मोहम्मद आमिर आणि नरजीस आमिरची प्रेमकहाणी चित्रपटातील कथेसारखीच आहे.5 / 10मोहम्मद आमिरला मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली तुरुंगात जावे लागले होते. त्यानंतर त्याची पत्नी नरजीसने मोहम्मद आमिरचा खटला लढण्याचा निर्णय घेतला. कारण नरजीस ही आमिरची त्यावेळी वकील होती. 6 / 10मॅच फिक्सिंगनंतर मोहम्मद आमिरला 2010 मध्ये 6 महिन्यांची शिक्षा झाली होती. तुरुंगात शिक्षा भोगत असताना आमिर त्याच्याच महिला वकिलाच्या प्रेमात पडला. नंतर दोघांनी लग्न केले.7 / 10ऑगस्ट 2010 मध्ये, पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरवर लॉर्ड्स क्रिकेट कसोटीत बुकी मजहर मजीदसह तीन क्रिकेटपटूंनी स्पॉट फिक्सिंगचा आरोप केला होता. 8 / 10त्यानंतर 'न्यूज ऑफ वर्ल्ड'च्या रिपोर्टरने स्टिंग ऑपरेशन केले. यात आमिर आरोपी सिद्ध झाला. लक्षणीय बाब म्हणजे मॅच फिक्सिंगसाठी मोहम्मद आमिरसह इतर आरोपी क्रिकेटपटूंनी मोठी रक्कम घेतली होती.9 / 10स्पॉट फिक्सिंगच्या आरोपानंतर मोहम्मद आमिरवर 2010 ते 2015 पर्यंत बंदी घालण्यात आली होती. मोहम्मद आमिर जेव्हा स्पॉट-फिक्सिंगच्या वादात अडकला होता, तेव्हा तो केवळ 18 वर्षांचा होता. मात्र, मोहम्मद आमिरने 2016 साली पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.10 / 10दरम्यान, 17 डिसेंबर 2020 रोजी मोहम्मद आमिरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आताच्या घडीला आमिर केवळ देशांतर्गत क्रिकेट खेळत असून तो पाकिस्तान सुपर लीगचा हिस्सा आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications