Cricket Buzz»फोटो गॅलरी »२०११चा वर्ल्ड कप खेळला, २०१२मध्ये CSKला IPL चॅम्पियन बनवलं अन् आता ऑस्ट्रेलियात चालवतोय बस!२०११चा वर्ल्ड कप खेळला, २०१२मध्ये CSKला IPL चॅम्पियन बनवलं अन् आता ऑस्ट्रेलियात चालवतोय बस! By स्वदेश घाणेकर | Published: March 01, 2021 10:57 AMOpen in App1 / 10२०११च्या वन डे वर्ल्ड कप संघाचा सदस्य असलेला आणि चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) २०१२मध्ये इंडियन प्रीमिअर लीगचे ( Indian Premier League) जेतेपद पटकावून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गोलंदाजावर आज उदरनिर्वाहासाठी ऑस्ट्रेलियात बस ड्राईव्हर म्हणून काम करावं लागत आहे.2 / 10ऑस्ट्रेलियातील Transdev या फ्रेंच कंपनीत हा क्रिकेटपटू बस ड्रायव्हर म्हणून काम करतोय. या कंपनीत जवळपास १२०० बस ड्राईव्हर आहेत आणि त्यापैकी ३ हे क्रिकेटपटू आहेत. स्थानिक क्लबसाठी हे तिघेही क्रिकेट खेळतात, परंतु त्यांनी आता उदरनिर्वाहासाठी बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.3 / 10आता तुम्हाला सर्वांना उत्सुकता लागली असेल की हे क्रिकेपटू कोण आणि यापैकी CSKचा सदस्य कोण होता? ट4 / 10श्रीलंकेच्या फिरकीपटू सुरज रणदीव ( Suraj Randiv) असे या खेळाडूचे नाव आहे. २०११च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील श्रीलंका संघाचा तो सदस्य होता आणि पोटाची खळगी भरण्यासाठी आता तो ऑस्ट्रेलियात बस चालवत आहे. सुरजसह झिम्बाब्वेचे चिंथाका नमस्ते आणि वॅडींग्टन एमवायेंगा हेही ऑस्ट्रेलियात बस ड्राईव्हर म्हणून काम करत आहेत. 5 / 10सुरजनं २०१९मध्ये ऑस्ट्रेलियात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता आणि आता तेथे त्याच्यावर बस ड्राईव्हर म्हणून काम करण्याची वेळ आली आहे. 6 / 10सुरजनं श्रीलंकेकडून १२ कसोटीत ४६ विकेट्स घेतल्या. ३१ वन डे व ७ ट्वेंटी-२० सामन्यांत अनुक्रमे ३६ व ७ विकेट्स घेतल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५६ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. 7 / 10३६ वर्षीय सुरज ऑस्ट्रेलियात बस ड्राईव्हरचं काम करता करता स्थानिक क्लबकडून क्रिकेटही खेळतो. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना सुरजनं यजमान संघाला फिरकीचा सराव करण्यासाठी मदत केली होती. 8 / 10सुरज येथील डाँडेनॉन्ग क्रिकेट क्लबकडून खेळतो. या क्लबला व्हिक्टोरीया प्रीमिअर लीगची मान्यता आहे. या क्लबमध्ये जेम्स पॅटिन्सन, पीटर सिडल हेही खेळतात. 9 / 10२०१२ च्या आयपीएलमध्ये सुरजनं ८ सामन्यांत ६ विकेट्स घेतली होती. 10 / 10 आणखी वाचा Subscribe to Notifications