PHOTOS : ब्लॅक अँड ब्युटी! सारा तेंडुलकरच्या घायाळ करणाऱ्या अदा; चाहते क्लिन बोल्ड

सारा तेंडुलकरने काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

भारतीय क्रिकेटचा चेहरा अर्थात सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर नेहमी चर्चेत असते. ती नवनवीन फोटो शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहते.

आता सचिनच्या लेकीने एका कार्यक्रमातील काही फोटो शेअर केले आहेत. सारा तेंडुलकरचा ग्लॅमरस लूक चाहत्यांना भुरळ घालत आहे.

काळ्या ड्रेसमध्ये साराचा बोल्ड अवतार सर्वांचे लक्ष वेधत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा ही काही अभिनेत्री नसली तरी तिची बी टाऊनमध्ये चर्चा असते.

सारा दिसायला खूपच सुंदर असून ती काही जाहिरातींमध्ये झळकली आहे. ती अनेक ब्रँड्सची अँबेसिडरही आहे.

तसेच बॉलिवूडमध्ये स्टारकिड्ससोबत सारा अनेकदा दिसते. त्यामुळे सिनेमा न करताही साराची बीटाऊनमध्ये चर्चा असते.

मात्र अलीकडेच समोर आलेल्या एका व्हिडीमुळे साराच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा रंगली. शूटिंग सेटवरील तिचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती खूपच क्युट दिसत आहे.

केवळ स्पोर्टिंग आयकॉनची लेक म्हणूनच नाहीतर सारा तिच्या वैयक्तिक कर्तृत्वाने सर्वांना भुरळ घालते.

सारा एक ऑनलाइन स्टोअर चालवते आणि अलीकडेच तिला भारतातील कोरियन ब्युटी ब्रँड लॅनिगची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले.