Join us

"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 19:47 IST

Open in App
1 / 7

भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग नेहमी चर्चेत असतो. सिक्सर किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या युवीने जुन्या आठवणींना उजाळा देताना एक जुना किस्सा सांगितला.

2 / 7

२००७ आणि २०११ च्या विश्वचषकात भारताने जग्गजेता होण्याचा मान पटकावला. या स्पर्धांमध्ये युवीने चमकदार कामगिरी करुन देशाला चॅम्पियन बनवण्यात हातभार लावला. युवराज अनेकदा त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत आला आहे. त्याने अभिनेत्री हेजल कीचसोबत लग्न केले आहे.

3 / 7

आता त्याने एक मोठा खुलासा करुन क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधले. २००७-०८ मधील एक किस्सा सांगताना त्याने म्हटले की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना काही कारणास्तव अभिनेत्रीची चप्पल घालून रुममधून बाहेर पडावे लागले होते. तो माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग असल्याचेही युवीने सांगितले.

4 / 7

मायकल वॉनसह अनेक क्रिकेटपटूंशी बोलत असताना युवी म्हणाला की, मी एका अभिनेत्रीला डेट करत होतो. मला तिचे नाव घ्यायचे नाही, पण ती सध्या खूप चांगली अभिनेत्री आहे. आताच्या घडीला ती खूपच अनुभवी अभिनेत्री आहे. ती एडिलेडमध्ये शूटिंग करत होती. तेव्हा मी तिला आपण काही काळ न भेटण्याचा आग्रह केला. कारण मी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होतो आणि मला माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे होते.

5 / 7

तसेच ती माझ्यासोबत बसमध्ये कॅनबेराला आली. दोन कसोटी सामन्यांमध्ये मी जास्त धावा केल्या नव्हत्या. तेव्हा मी तिला विचारले की, तू इथे काय करत आहेस? यावर ती म्हणाली की, मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे. मग मी तिला रात्री भेटलो आणि तू तुझ्या तू तुझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे आणि मला माझ्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे असे सांगितले, असेही युवीने नमूद केले.

6 / 7

युवराजने पुढे सांगितले की, आम्ही कॅनबेराहून एडिलेडला जात होतो आणि तिने माझी सुटकेस पॅक केली. मात्र, त्यात तिने तिचे शूज पॅक केले होते. मी संघाच्या बसमध्ये चढण्याच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी माझे शूज नसल्याचे लक्षात आले. मग पर्याय नसल्यामुळे त्या अभिनेत्रीने तिचे शूज घालण्यास सुचवले आणि मला ते करावे लागले.

7 / 7

खरे तर युवराजचे नाव किम शर्मा आणि दीपिका पादुकोणसह अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले होते. २०१६ मध्ये त्याने हेजल कीचशी लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत.

टॅग्स :युवराज सिंगभारतीय क्रिकेट संघदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टआॅस्ट्रेलिया