Cricket Buzz»फोटो गॅलरी »रांचीमधील मंदिर अन् धोनी...असं आहे श्रद्धेचं नातं; जाणून घ्या सर्वकाहीरांचीमधील मंदिर अन् धोनी...असं आहे श्रद्धेचं नातं; जाणून घ्या सर्वकाही By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 3:57 PMOpen in App1 / 10भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताना चाहत्यांना मोठा धक्का दिला. 15 ऑगस्ट 2020 ही तारीख धोनी चाहत्यांसाठी धक्का देणारी ठरली. धोनीनं शनिवारी सायंकाळी 7.29 मिनिटांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून चाहत्यांना मोठा धक्का दिला. 2 / 10''माझ्या या प्रवासात तुम्ही दिलेल्या पाठिंबा आणि प्रेमाबद्दल आभार... 7.29 मिनिटांपासून मला तुम्ही क्रिकेटमधून निवृत्त झालो असं समजा,''धोनीनं ही पोस्ट करून चाहत्यांना झटका दिला. 3 / 10वन डे, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसीच्या तीनही प्रमुख स्पर्धा जिंकणारा जगातला एकमेव कर्णधार आहे धोनी. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत टीम इंडियानं अव्वल स्थान मिळवले, ते धोनीच्या नेतृत्वाखालीच. 4 / 1040 वर्षांत ऑस्ट्रेलियाला कसोटीत व्हाईटवॉश कुणी दिला नव्हता, तो धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं विक्रम नोंदवला. याशिवाय त्याच्या नावावर अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. रांची येथील एका मंदिराचे आणि धोनीचे अतूट नाते होते. ते मंदिर कोणते? जाणून घेऊया...5 / 10रांची ते टाटा महामार्गावर असलेल्या तमाड गावात देवरी मातेचे मंदिर आहे. रांचीपासून ते 60 कि.मी. अंतरावर धोनी अनेकदा या मंदिरात दर्शनासाठी जात होता. धोनीच्या नियमित जाण्यामुळे हे मंदिर प्रचंड प्रसिद्ध झाले. हे मंदिर 700 वर्षांपूर्वी बांधल्याचे, येथील लोकं सांगतात. 6 / 10धोनी रांचीत असताना नेहमी या मंदिरात दर्शनासाठी जातो. 2011च्या वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी धोनीनं या मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले होते. इतकंच नव्हे, तर वर्ल्ड कप विजयानंतर तो जेव्हा रांचीत आला तेव्हाही तो या मंदिरात दर्शनासाठी गेला होता, असा तेथील लोकं सांगतात.7 / 10साडे तीन फूटाची मूर्ती असून तिला 16 भुजा आहेत, मूर्तीवर ओडिशातील कलेचा प्रभाव 8 / 10सिंहभूमचे राजे मुंडा यांनी १३ व्या शतकात मंदिराची स्थापना केली, युद्धात परास्त झाल्यानंतर राजाने या मंदिराचे बांधकाम केले 9 / 10कालांतराने त्यांना त्यांचे राज्य परत मिळाले, अशी भावना आहे, मंदिराच्या परंपरांमध्ये झारखंडमधील आदिवासी संस्कृतीची छाप 10 / 10आठवड्यातील सहा दिवस देवीची सेवा आदिवासींकडून केली जाते आणखी वाचा Subscribe to Notifications