सुनील गावस्कर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी विराट कोहली आणि लोकेश राहुल यांच्या ६७ धावांच्या संथ भागीदारीला पराभवाचे कारण सांगितले, तर हरभजन सिंग म्हणाला की अहमदाबादची खेळपट्टी भारतीय संघासाठी टेंशनदायी ठरली. भारताचा माजी सलामवीर गौतम गंभीर आणि पाकिस्तानचा माजी दिग्गज वसीम अक्रम यांनीही टीका केली आहे. अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीच्या क्रमांत केलेला बदल महागात पडला आणि गंभीर व अक्रम या निर्णयावर संतप्त दिसले.
भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरने स्पोर्ट्सकीडाशी बोलताना सूर्यकुमार यादवला सहाव्या क्रमांकाऐवजी सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याच्या निर्णयावर जोरदार टीका केली. तो म्हणाला, 'सूर्यकुमारच्या पुढे रवींद्र जाडेजाला का पाठवण्यात आले, हे मला समजत नाही. सूर्याला सातव्या क्रमांकावर का पाठवण्यात आले? माझ्या मते हा निर्णय योग्य नव्हता.'
गंभीरसोबतच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमलाही सूर्यकुमारचा फलंदाजीचा क्रम बदलण्याचा निर्णय आवडला नाही. तो म्हणाला, 'मला म्हणायचे आहे की तो संघात फलंदाज म्हणून खेळत होता. हार्दिक पांड्या संघात असता तरच मला हे डावपेच समजू शकले असते.'
गौतम गंभीर पुढे म्हणाला की, अंतिम सामन्यात सूर्याला सहाव्या क्रमांकावर पाठवले असते तर कदाचित परिस्थिती वेगळी असती. तुम्हाला वाटते, जर लोकेश राहुल व विराट कोहली संथ गतीने खेळत होते, तर सूर्यकुमारला वर पाठवून आक्रमक क्रिकेट खेळण्याचा निर्णय योग्य ठरला असता, कारण तेव्हा तुमच्या मागे जडेजा होता.'
गंभीर पुढे म्हणाला, 'सूर्यकुमार धडपडत होता, असे म्हणणे एखाद्या तज्ज्ञासाठी खूप सोपे असते, पण खेळाडूची मानसिकता अशी असते की, तो बाद झाला, तर पुढचा फलंदाज मोहम्मद शमी, बुमराह आणि सिराज असेल. मात्र, जर सूर्या बरोबर होता. त्याला माहीत होते की जडेजा पुढचा फलंदाज म्हणून येईल, त्याची मानसिकता वेगळी असती.