Join us  

खंबीर क्रिकेटरसंदर्भातील 'गंभीर' गोष्ट; दमदार खेळीपेक्षा अधिक गाजला मैदानातील 'दंगा'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 12:32 PM

Open in App
1 / 8

भारतीय संघाचा विद्यमान प्रशिक्षक गौतम गंभीर १४ ऑक्टोबर, २०२४ ला ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे.

2 / 8

आक्रमक अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या गौतम गंभीरनं २००७ च्या हंगामातील टी-२० वर्ल्ड कपसह २०११ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत संघाच्या विजायात मोलाचा वाटा उचलला होता.

3 / 8

कामगिरीशिवाय आक्रमक तोऱ्यामुळे मैदानात या दिग्गजाच्या बाबातीत काही वादग्रस्त सीनही पाहायला मिळाले आहे. एक नजर गौतम गंभीरच्या क्रिकेट कारकिर्दीत मैदानात गाजलेल्या वादग्रस्त प्रकरणांवर..

4 / 8

पाकिस्तानच्या संघाने २००७ मध्ये भारताचा दौरा केला होता. ५ सामन्यांच्या वनडे मालिकेतील कानपूरच्या ग्रीन पार्कवर रंगलेल्या तिसऱ्या वनडेत गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी यांच्यात वादग्रस्त सीन पाहायला मिळाला होता. सिंगल धाव घेताना आफ्रिदी भारतीय क्रिकेटरला धडकल्यानंतर जे घडलं ते चांगलंच गाजलं.

5 / 8

आयपीएलमध्ये गंभीर-विराट एकमेकांविरुद्ध भिडल्याचा सीन पाहायला मिळाला होता. पण आता दोघांच्यातील सीन ऑल इज वेल असा असल्याचे दिसून येते.

6 / 8

२०१० च्या आशिया कप स्पर्धेत गौतम गंभीर पाकिस्तानी विकेट किपर बॅटर कामरान अकमल याला भिडल्याचे पाहायला मिळाले होते. या दोघांना रोखण्यासाठी MS धोनीला मध्यस्थी करावी लागली होती.

7 / 8

२०१५ च्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत गौतम गंभीर आणि पश्चिम बंगालचा तत्कालीन कॅप्टन मनोज तिवारी यांच्यात शाब्दिक वाद रंगला होता. दिल्लीच्या मैदानात रंगलेल्या सामन्यावेळी सध्यांकाळी भेट तुला दाखवतो, अशी धमकीच गंभीरनं मनोज तिवारीला दिली होती. या प्रकरणात गंभीरवर कारवाई देखील झाली होती.

8 / 8

गंभीर हा ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉटसनलाही भिडल्याचे पाहायला मिळाले होते. २०१८ मध्ये दिल्ली कसोटी सामन्यात या दोघांच्यात स्लेजिंगचा खेळ पाहायला मिळाला होता. या प्रकरणामुळे द्विशतकानंतर गंभीरला एका सामन्याची बंदीची कारवाई झाली होती.

टॅग्स :गौतम गंभीरभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ