Join us  

Gautam Gambhir on KL Rahul Captaincy, IPL 2022: "Lucknow Super Giants चा कॅप्टन झालास म्हणून असं समजू नकोस की..."; गौतम गंभीरची लोकेश राहुलला 'वॉर्निंग'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 9:09 PM

Open in App
1 / 6

Gautam Gambhir KL Rahul, IPL 2022: 'आयपीएल'मध्ये नव्याने सहभागी होत असलेला लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) हा सर्वात महागडा संघ आहे. लोकेश राहुल या संघाचा कर्णधार आहे तर गौतम गंभीर संघाचा मेंटॉर म्हणजेच मार्गदर्शक आहे.

2 / 6

LSG हा संघ नवीन असल्यामुळे संघाच्या बांधणीच्या दृष्टीने सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. तशातच IPL 2022 सुरू होण्यापूर्वी गौतम गंभीरने कर्णधार केएल राहुलबद्दल मोठं विधान केलं असून त्याला थेट वॉर्निंग दिली आहे.

3 / 6

'राहुल एक कर्णधार म्हणून मैदानाच्या आत आणि बाहेर संघाचं नेतृत्व करेल. आमच्यासाठी राहुल कर्णधारापेक्षाही एक फलंदाज म्हणून जास्त महत्त्वाचा आहे. कारण आम्हाला असा फलंदाज संघात हवा होता ज्याला कर्णधारपदही भूषवता येत असेल', असं गंभीरने पीटीआयच्या मुलाखतीत स्पष्ट सांगितलं.

4 / 6

'कर्णधाराने जोखीम पत्करायला शिकलं पाहिजे. राहुलने संघात मोजकी जोखीम घ्यावी, कारण संघात क्विंटन डी कॉक हा किपिंग करणार आहे. त्यामुळे राहुलला नेतृत्व करण्यावर पूर्ण लक्ष देता येईल.'

5 / 6

टीम इंडियाच्या संघात खेळण्यासाठी सारेच खेळाडू उत्सुक असतात. पण लोकेश राहुलने एका गोष्टीचं कायम भान ठेवायला हवं, असं गौतम गंभीर म्हणाला.

6 / 6

'भारताच्या संघाचा विचार करत कधीही IPL खेळू नकोस. कारण तू जरी IPL संघाचा कॅप्टन झालास असलास, तरी त्यामुळे तू टीम इंडियाचा कर्णधार होशील याची काहीही गॅरंटी नाही', असी थेट वॉर्निंग गौतम गंभीरने लोकेश राहुलला दिली.

टॅग्स :आयपीएल २०२२गौतम गंभीरलोकेश राहुललखनौ सुपर जायंट्स
Open in App