Join us  

Gautam Gambhir: गौतम गंभीरची भारतीय संघाबद्दल मोठी भविष्यवाणी; जाहीर केले २ नवीन कर्णधार!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 5:41 PM

Open in App
1 / 11

सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे मालिकेचा थरार रंगला आहे. ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून किवी संघाने मालिकेत १-० ने आघाडी घेतली होती. मात्र रविवारी होणारा दुसरा सामना पावसाच्या कारणास्तव रद्द करण्यात आला. त्यामुळे भारतीय संघाच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली. आता आगामी तिसरा सामना निर्णायक सामना असणार आहे.

2 / 11

दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना १२.५ षटकांत १ गडी गमावून ८९ धावा केल्या होत्या, मात्र अचानक पावसाचे आगमन झाले आणि खेळ थांबला अखेर सामना देखील रद्द करावा लागला. रविवारी होणारा सामना रद्द झाल्यामुळे भारतीय संघाचे मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. कारण आता भारतीय संघ केवळ मालिका बरोबरीत ठेवू शकतो.

3 / 11

दरम्यान, न्यूझीलंडविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर होती. तर वनडे मालिकेत शिखर धवन भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. विश्वचषकाची स्पर्धा झाल्यानंतर भारताच्या काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, यामध्ये नियमित कर्णधार रोहित शर्माचा देखील समावेश आहे.

4 / 11

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. गंभीर एक स्पष्टवक्ता म्हणून ओळखला जातो, पण अनेकवेळा तो त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिला आहे. आता देखील गंभीरने एक विधान करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. खरं तर गौतम गंभीरने भारतीय संघाबाबत भविष्यवाणी केली आहे.

5 / 11

गंभीरने भारतीय संघाच्या भविष्यातील कर्णधारांची नावे जाहीर केली आहेत. हार्दिक पांड्यासोबत त्याने युवा खेळाडूचे देखील वर्णन भावी कर्णधार म्हणून केले आहे. भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा सध्या संघापासून दूर आहे. ट्वेंटी-२० विश्वचषकानंतर रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. तो आगामी बांगलादेशविरूद्धच्या वनडे मालिकेतून खेळताना दिसणार आहे.

6 / 11

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्सने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना गंभीर म्हणाला, 'हार्दिक पांड्या स्पष्टपणे भारताच्या ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदाच्या रांगेत आहे. परंतु रोहितसाठी हे दुर्दैवी असेल कारण मला वाटते की तो फक्त एका आयसीसी स्पर्धेत कर्णधार राहिला आहे. एकाच स्पर्धेतून एखाद्याची क्षमता ओळखणे हे बरोबर नाही.'

7 / 11

हार्दिक पांड्यासोबतच गंभीरने पृथ्वी शॉचा देखील भारताचा भावी कर्णधार म्हणून उल्लेख केला आहे. गंभीरचे हे विधान खूप मोठे मानले जात आहे कारण पृथ्वी शॉ सध्या भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडत आहे. अलीकडेच न्यूझीलंड आणि बांगलादेशविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली तेव्हा त्याने उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. साई बाबा सर्व काही पाहत आहेत अशी स्टोरी ठेवून पृथ्वीने नाराजी व्यक्त केली होती. 8

8 / 11

पृथ्वी शॉबद्दल बोलताना गंभीर आणखी म्हणाला, 'मी पृथ्वी शॉची निवड करण्याचे कारण म्हणजे मला माहित आहे की बरेच लोक त्याच्या मैदानाबाहेरील चढउतारांबद्दल बोलतात. परंतु ते प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांचे काम आहे. निवडकर्त्यांचे काम फक्त १५ खेळाडू निवडण्याचे नसून लोकांना योग्य मार्गावर आणणे देखील आहे. पृथ्वी शॉ एक अतिशय आक्रमक कर्णधार, एक अतिशय यशस्वी कर्णधार असू शकतो कारण तुम्ही वैयक्तिक खेळ करताना ती आक्रमकता पाहू शकता.'

9 / 11

न्यूझीलंडविरूद्धची मालिका संपल्यानंतर भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. तिथे वनडे आणि कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेतून संघातील वरिष्ठ खेळाडूंचे पुनरागमन होणार आहे.

10 / 11

बांगलादेशविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत, ईशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यश दयाल.

11 / 11

बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

टॅग्स :गौतम गंभीररोहित शर्मापृथ्वी शॉहार्दिक पांड्याभारतीय क्रिकेट संघ
Open in App