Chetan Sakariya Marriage Photos: टीम इंडियाचा श्रीलंका दौरा २७ जुलैपासून सुरू होत आहे. याआधी गौतम गंभीरचा शिष्य आणि टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज चेतन साकारिया विवाहबंधनात अडकला आहे.
IPL मधील कोलकाता नाइट रायडर्सचा खेळाडू असलेल्या चेतनने त्याची मैत्रीण मेघना जंबुचा हिच्यासोबत लग्न केले. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला.
चेतन साकरियाने आपल्या अकाऊंटवरून काही खास फोटो शेअर केले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात त्यांचा साखरपुडा झाला होता.
साखरपुडा झाल्यानंतर चेतन साकरियाला IPL 2024मध्ये कोलकाताने संघात घेतले पण त्याला एकही सामना खेळायची संधी मिळाली नाही.
चेतन आणि मेघना यांनी आपल्या आयुष्यातील नवी इनिंग सुरु केली असून लग्नाचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.