Join us  

सर्वांना MS Dhoniचा सिक्स आठवतो, पण...! गौतम गंभीरची जोरदार फटकेबाजी; युवी, सचिनबद्दल म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 1:47 PM

Open in App
1 / 6

२०११ नंतर भारतात पुन्हा वन डे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत भारतातील १० शहरांमध्ये वर्ल्ड कप स्पर्धचे सामने होणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जेतेपद पटकावेल, असा सर्वांना विश्वास आहे.

2 / 6

२०१३ नंतर भारताला आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही आणि हा दुष्काळ १० वर्षांनी संपण्याची अपेक्षा आहे. अशात भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने ( Gautam Gambhir) २०११ च्या वर्ल्ड कप विजयाच्या आठवणींना उजाळा दिला आणि अप्रत्यक्षपणे MS Dhoni ला टोमणा मारला.

3 / 6

२०११च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत युवराज सिंग आणि झहीर खान हे खरे नायक होते, असं तो म्हणाला. त्याने एक खेळाडू वर्ल्ड कप जिंकून देऊ शकत नाही, असे विधान करून धोनीवर अप्रत्यक्ष टीका केली. भारताने वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेवर विजय मिळवून जेतेपद पटकावले होते. युवराज सिंग मॅन ऑफ दी सिरीज राहिला होता.

4 / 6

“जेव्हा तुम्ही श्रेय न देण्याबद्दल बोलता तेव्हा मला विसरून जा. मला वाटते की युवराज सिंगलाही पुरेसे श्रेय दिलेले नाही. मला सांगा की वर्ल्ड कप फायनलमधील झहीर खानच्या पहिल्या स्पेलबद्दल किती लोक बोलतात, ज्याने आमच्यासाठी विजयाचा पाया सेट केला होता. ५-४-४-२... मला सांगा किती जणांना ते आठवते. हे एका खेळाडूबाबत नाही, सोशल मीडियाच्या माध्यमातून आख्यान तयार केले गेले. तुम्ही व्यक्तीपूजा करता आणि हा मानवी स्वभाव आहे,” असे गंभीरने Revv Sportzला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.

5 / 6

“तुम्ही संघ आणि संघातील सदस्यांनी काय केले हे विसरता. वर्ल्ड कप जिंकण्यासाठी एकच व्यक्ती पूरेशी नाही. भारतात नायकांची पूजा करतो किंवा आपल्याच खेळाडूंची वैयक्तिकरित्या पूजा करतो. आम्ही त्यांच्याबद्दल बोलू लागतो. आम्ही त्यांना क्रिकेटच्या खेळाच्या पलीकडे वागवू लागतो. त्यामुळे माझ्यासाठी, मला वाटते की आपण माझ्या ९७ बद्दल बोलू नये. मला वाटते की युवराज सिंगने खूप मोठे योगदान दिले. २०११ मधील त्याच्या योगदानाबद्दल किती लोक बोलतात? त्याने संपूर्ण स्पर्धेत ज्या प्रकारे कामगिरी केली, त्याबद्दल कोण चर्चा करतं का?,' असे पुढे गंभीर म्हणाला.

6 / 6

युवीप्रमाणे झहीर खान, सुरेश रैना, मुनाफ पटेल यांनीही योगदान दिले होते. सचिन तेंडुलकर तर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता, परंतु आपण त्यावर बोलतो का? मीडिया फक्त MS Dhoniच्या षटकाराबद्दल बोलते, असेही गंभीर म्हणाला.

टॅग्स :गौतम गंभीरमहेंद्रसिंग धोनीवन डे वर्ल्ड कप
Open in App