रोहित-बुमराह संघाबाहेर, धोनीला संधी; गौतम गंभीरने निवडला 'ऑल टाईम बेस्ट' वन-डे संघ

Rohit Sharma Jasprit Bumrah, Gautam Gambhir All-Time India XI: या संघाची निवड करताना गौतम गंभीरने अनेक आश्चर्यकारक निर्णय घेतले

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याचा श्रीलंका दौरा मिश्र स्वरुपाचा ठरला. टी२० मालिकेत भारताला निर्भेळ यश मिळाले. तर वनडे मालिकेत टीम इंडियाला लाजिरवाणा पराभव झाला.

बांगलादेश कसोटी मालिकेआधी सध्या गंभीर ब्रेकवर आहे. यादरम्यान, गौतम गंभीरने 'ऑल टाइम बेस्ट वन-डे' संघाची निवड केली. या संघाची निवड करताना गौतम गंभीरने अनेक आश्चर्यकारक निर्णय घेतले.

गौतम गंभीरने वीरेंद्र सेहवाग आणि स्वत: गंभीर अशा जोडीला त्याच्या 'ऑलटाइम इंडिया वनडे 11' संघात सलामी जोडी म्हणून समाविष्ट केले आहे. त्यामुळे त्याने रोहित शर्माला स्थान दिलेले नाही.

त्याने तिसऱ्या क्रमांकासाठी महान फलंदाज राहुल द्रविडची तर चौथ्या क्रमांकावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकरची निवड केली आहे. याशिवाय त्याच काळातील युवराज सिंगचाही संघात समावेश केला आहे.

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला गंभीरने संघात स्थान दिले आहे. याशिवाय गंभीरने टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार असलेल्या महेंद्रसिंग धोनीला देखील संघात जागा दिली आहे.

गंभीरने आपल्या संघात दोन फिरकीपटूंना स्थान दिले आहे. बळींच्या आकड्याचा विचार करत त्याने भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारे दोन गोलंदाज अनिल कुंबळे आणि रविचंद्रन अश्विन यांना स्थान दिले आहे.

गंभीरने वेगवान गोलंदाजांमध्ये इरफान पठाण आणि झहीर खान या दोघांचा संघात समावेश केला आहे. सध्याच्या घडीला भारताचा आघाडीचा गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराहला मात्र त्याने संघात घेतलेले नाही.