PHOTOS : 'नॅशनल क्रश' Smriti Mandhana चा ग्लॅमरस लूक; चाहते म्हणाले, "मेकअपची..."

स्मृती मानधनाच्या अदांवर चाहते फिदा.

नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्ध असलेली भारताच्या महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना. स्मृती तिच्या खेळीसह सौंदर्यामुळेही चर्चेत असते.

तिचा ग्लॅमरस लूक चाहत्यांना भुरळ घालत असतो. क्रिकेटमधून वेळ मिळाल्यानंतर भटकंती करणारी स्मृती नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करुन चाहत्यांच्या संपर्कात राहते.

पुढच्या महिन्यात महिलांचा ट्वेंटी-२० विश्वचषक होणार आहे. स्मृती मानधनाचे लाखो चाहते आहेत. स्मृतीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत असतात.

स्मृतीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा फॉर्मल लूक चाहत्यांना आकर्षित करत आहे.

स्मृतीने व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटले की, तुम्ही अशा क्षणांना पाहू शकत नाही त्यांना कॅमेऱ्यात कैद करुन ठेवा.

स्मृती मानधनाच्या सौंदर्याचे कौतुक करताना एका चाहत्याने म्हटले की, स्मृती तुला मेकअपची गरजही नाही.

भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना तिच्या अप्रतिम खेळीने प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. तिच्या सौंदर्यामुळे भारताची नॅशनल क्रश म्हणून तिला ओळख मिळाली.

स्मृतीची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमी आतुर असतात. काही महिन्यांपूर्वी महिला प्रीमिअर लीगमध्ये (WPL 2024) स्मृती मानधनाच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने किताब जिंकला.