१०० मीटरपेक्षा अधिक लांब षटकार गेल्यास ८ धावा ( 8 runs for sixes over 100 meters)
ख्रिस गेल, आंद्रे रसेल, एबी डिव्हिलियर्स, विराट कोहली आदी स्फोटक फलंदाज समोर असताना प्रतिस्पर्धी गोलंदाजाच्या मनात धडकी भरणे साहजिकच आहे. अगदी सहजतेनं ही मंडळी चेंडू सीमापार पाठवतात. पण, त्यांनी कितीही उत्तुंग फटका मारला किंवा चेंडू अगदी स्टेडियमबाहेर पाठवला, तरी त्यांना फक्त ६ धावांवर समाधान मानावे लागते. या नियमात ट्विस्ट आणल्यास.. म्हणजे चेंडू १०० मीटर लांब टोलवल्यास ८ धावा, असा नियम आणल्यास फलंदाजांकडून आणखी उत्तुंग षटकारांची आतषबाजी पाहायला मिळेल.