टीम इंडियाचा संयमी मराठमोळा फलंदाज अजिंक्य रहाणे याच्या लग्नाचा आज वाढदिवस.
वाढदिवस दरवर्षी येत असला तरी आजचा वाढदिवस अधिकच खास आहे. आज अजिंक्यच्या लग्नाची दशकपूर्ती झाली.
२६ सप्टेंबर २०१४ ला अजिंक्यने त्याची मैत्रिण राधिका धोपावकर हिच्याशी लग्न केले. अजिंक्य रहाणेची लव्ह स्टोरी खूपच रंजक आहे.
अजिंक्य रहाणेचे आपल्याच बहिणीच्या मैत्रिणीवर प्रेम जडलं होतं. बरेच वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी विवाह केला.
लग्नाच्या मंडपात मात्र त्याची पत्नी राधिका अजिंक्यवर चिडली होती. अजिंक्य रहाणेने एका मुलाखतीत आपल्या लग्नाचा मजेशीर किस्सा सांगितला होता.
अजिंक्य पुढे म्हणाला की, मुलीकडच्यांनी माझे कपडे आणण्याचा विचार माझ्या डोक्यात होता पण तसं काहीच झालं नाही. मला जीन्स आणि टी-शर्ट घालून लग्नाला यावं लागलं.
जेव्हा अजिंक्य रहाणे जीन्स आणि टी-शर्ट घालून लग्नाला पोहचला तेव्हा पत्नी राधिकाला खूप राग आला होता. राधिकाच्या कुटुंबीयांनाही राग आला होता.
त्यावेळी अजिंक्य रहाणेला जाणवलं होतं की त्याने किती मोठी चूक केली आहे. पण त्यानंतर सारं काही नीट झालं आणि अजिंक्य-राधिकाचे लग्न नीट पार पडले.
अजिंक्य रहाणे आणि राधिका हे दोघेही एकाच सोसायटीमध्ये राहायचे. राधिका ही अजिंक्य रहाणेच्या बहिणीची खूप चांगली आणि खास मैत्रीण होती.
लग्नाचा मजेशीर किस्सा सांगताना राधिकाही म्हणाली की, अजिंक्य लग्नात पिवळ्या रंगाचं टी-शर्ट आणि जीन्स घालून आला होता. त्यामुळे ती चिडली होती.
बरेच वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि राधिका हे दोघेही २०१४ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. रहाणे दाम्पत्याला सध्या २ गोंडस मुले आहेत.
अजिंक्यने आज काही फोटो शेअर करत लिहिले की, एक अद्भूत इनिंग सुरू होऊन आज दशक पूर्ण झाले. आणखी खूप वर्षे ही इनिंग सुरू राहिल.
राधिकानेही काही रोमँटिक फोटो शेअर करत लिहिले की- प्रेम, हास्य अन् एकमेकांना सांभाळून घेण्याची आज दशकपूर्ती झाली. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
सर्व फोटो सौजन्य- अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकर इन्स्टाग्राम