Join us  

MS Dhoni Retirement: महेंद्रसिंग धोनीचे 'हे' दहा विक्रम मोडणे अशक्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 11:02 AM

Open in App
1 / 11

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज 39वा वाढदिवस. उत्तम कर्णधार, मॅच फिनीशर फलंदाज, चपळ यष्टिरक्षक आणि मार्गदर्शक अशी धोनीची ओळख करून देता येईल. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत धोनीनं अनेक विक्रम केले आणि त्याचे हे विक्रम मोडणे अशक्य आहे.

2 / 11

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) तीनही प्रमुख स्पर्धा जिंकणारा जगातील एकमेव कर्णधार... धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं 2007मध्ये ट्वेंटी-20, 2011मध्ये वन डे आणि 2013मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.

3 / 11

कर्णधार म्हणून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रमही धोनीच्या नावावर आहे. 2007मध्ये ट्वेंटी-20 संघाचे नेतृत्व सांभाळून वर्ल्ड कप जिंकणाऱ्या धोनीकडे 2008मध्ये वन डे व कसोटी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. त्यानंतर त्यानं तीनही फॉरमॅटमध्ये मिळून 332 सामन्यांत टिम इंडियाचे नेतृत्व सांभाळले आहे. ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगनं 324 सामन्यांत संघाचे नेतृत्व सांभाळले आहे.

4 / 11

भारतासाठी कर्णधार म्हणून सर्वाधिक विजयाचा विक्रमही धोनीच्या नावावर आहे. त्यानं तीनही फॉरमॅटमध्ये 332 सामन्यांत 178 विजय मिळवले आहेत. वन डे क्रिकेटमध्ये 200 सामन्यांत नेतृत्व करण्याचा विक्रमही धोनीच्याच नावावर आहे.

5 / 11

भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक धावांचा विक्रमही धोनीच्या नावावर आहे. त्यानं कर्णधार म्हणून 200 वन डे सामन्यांत 53.56 च्या सरासरीनं 6641 धावा केल्या आहेत. या विक्रमात ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग अव्वल स्थानावर आहे.

6 / 11

महेंद्रसिंग धोनीनं वन डे क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक 204 षटकार खेचले आहेत.

7 / 11

आयपीएलमध्येही चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व सांभाळताना त्यानं सर्वाधिक विजयाची नोंदही केले आहेत. धोनीनं 174 सामन्यांत 104 विजय मिळवले आहेत, तर 69 सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे.

8 / 11

यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून वैयक्तिक धावाचा विक्रमही धोनीच्या नावावर आहे. त्यानं 2005मध्ये श्रीलंकेविरुद्ध वन डे सामन्यात 145 चेंडूंत 15 चौकार व 10 षटकार खेचून 183 धावा चोपल्या होत्या.

9 / 11

2011च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील धोनीनं मारलेला षटकार आजही सर्वांच्या लक्षात आहे. त्याच्या त्या षटकारानं भारताला 28 वर्षांनंतर विश्वविजेता बनवलं. वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात षटकार मारून विजय साजरा करणारा धोनी हा क्रिकेट इतिहासातिल एकमेव फलंदाज आहे.

10 / 11

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्टम्पिंगचा विक्रमही धोनीच्या नावार आहे. त्यानं 538 सामन्यांत 195 स्टम्पिगं केले आहेत. श्रीलंकेचा कुमार संगकारा 139 स्टम्पिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे.

11 / 11

महेंद्रसिंग धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी यष्टिरक्षक आहे. त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 829 बळी टिपले आहेत. त्यात 195 स्टम्पिंग आणि 634 झेल आहे.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीभारतीय क्रिकेट संघचेन्नई सुपर किंग्स