Join us

इरफान पठाणची पत्नी होती सुपर मॉडल, पाहा तिचे न पाहिलेले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 16:31 IST

Open in App
1 / 14

भारतीय संघातील यशस्वी अष्टपैलू खेळाडूंमध्ये ज्याचं नाव आजही घेतलं जातं, अशा इरफान पठाणचा आज वाढदिवस. 27 ऑक्टोबर 1984 मध्ये गुजरात येथे झाला.

2 / 14

टीम इंडियात त्यानं गोलंदाज म्हणून एन्ट्री केली खरी, परंतु त्यानं अष्टपैलू म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. डिसेंबर 2003मध्ये त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

3 / 14

वयाच्या 19व्या त्यानं टीम इंडियात पदार्पण केले. 2001-02मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यानं दमदार कामगिरी करून निवड समितीचे लक्ष वेधले.

4 / 14

ऑस्ट्रेलियाविरुद्ध एडलेड कसोटीत तो पहिल्यांदा भारताकडून खेळला आणि तो सामना जिंकून भारतानं ऑस्ट्रेलियात 23 वर्षानंतर विजयाचा दुष्काळ संपवला. याच दौऱ्यावर त्यानं वन डे संघातही पदार्पण केले.

5 / 14

2006मध्ये पाकिस्तानविरुद्ध इरफानने जबरदस्त कामगिरी केली होती. त्यानं पहिल्याच षटकात हॅटट्रिक घेत इतिहास घडवला होता. सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या इरफानला तेव्हाचे प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांनी फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले.

6 / 14

2006मध्ये त्याला कसोटी व वन डे संघातून वगळण्यात आले. त्यानंतर त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक चढउतार झाले. 2012मध्ये इरफान अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.

7 / 14

फेब्रुवारी 2016मध्ये इरफान लग्नबेडीत अडकला. त्याची पत्नी सफा बेग ही आखाती देशांत मॉडल होती. हैदराबाद येथे 28 फेब्रुवारी 1994 साली तिचा जन्म झाला. पण, ती लहानाची मोठी सौदी अरेबियात झाली आणि तिथेच तिनं शिक्षण पूर्ण केलं.

8 / 14

सफा मध्यपूर्व आशियातील सुप्रसिद्ध मॉडल होती. अनेक फॅशन मॅगजीनच्या कव्हर पेजवर ती दिसली होती. इरफान आणि सफा यांची दुबईत भेट झाली होती. दोन वर्षांच्या प्रेम संबंधानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

9 / 14

इरफानने 29 कसोटीत 100 विकेट्स घेतल्या आहेत. 59 धावांत 7 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यानं 120 वन डे सामन्यांत 173 आणि 24 ट्वेंटी-20 सामन्यांत 28 विकेट्स घेतले आहेत.

10 / 14

11 / 14

12 / 14

13 / 14

14 / 14

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबीसीसीआय