Join us  

Happy birthday Kieron Pollard : किरॉन पोलार्डसमोर पैसे कमावण्याचा होता सोपा मार्ग, पण त्यानं गुंडगिरी करण्यापेक्षा निवडला क्रिकेटपटू बनण्याचा पर्याय!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 1:14 PM

Open in App
1 / 12

मुंबई इंडियन्सचा किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) हो असंच म्हणावं लागेल... इंडियन प्रीमिअर लीगमुळे ( IPL 2021) पोलार्ड हा भारतीयांच्या घराघरांत पोहोचला अन् तो Mumbai Indiansच्या चाहत्यांचा घरातील सदस्यच बनला.

2 / 12

12 मे 1987 मध्ये त्रिनिदाद येथील टकरिगुआ येथील त्याचा जन्म. आज जगभरातील ट्वेंटी-20 लीगमध्ये आपला करिष्मा दाखवणाऱ्या पोलार्डसमोर पैसे कमावण्याचा सोपा मार्ग होता आणि तो त्याला सहज निवडताही आला असता, परंतु त्यानं क्रिकेटपटू बनण्याचं ठरवलं.

3 / 12

घरात अठराविश्व दारित्र्य असतानाही तो संघर्ष करत राहिला अन् आज जगभरातील अनेक फ्रँचायझी त्याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी पैसा ओतण्यास तयार आहे...

4 / 12

त्रिनिदाद येथील टकरिगुआ येथे जन्मलेल्या पोलार्ड लहान असतानाच वडील घर सोडून गेले. तो, दोन बहिणी आणि आई अशा परिवाराला पुढे अनेक संकटांचा सामना करावा लागला. आईनं घराची जबाबदारी सांभाळली अन् ती मुलांना घेऊन टुनापूना पीआरको या शहरात स्थलांतरीत झाली. हे शहर गुन्हेगारांचे शहर म्हणून ओळखले जायचे.

5 / 12

ड्रग्सचा सर्रास वापर, गँगवॉर, दिवसाढवळ्या लुटमार हे या शहरात नवीन नव्हतं. अशात पोलार्डही भरकटला असता अन् गुन्हेगारी विश्वात गेला असता. पण, त्यानं तसं केलं नाही. टुनापूना पीआरकोची एक खासियत अशी की येथे खेळांनाही अत्यंत महत्त्व होतं. क्रिकेट, फुटबॉल, अॅथलेटिक्स असे विविध खेळ येथे खेळले जायचे आणि त्यामुळेच पोलार्डनं क्रिकेटपटू बनण्याचा निर्णय घेतला.

6 / 12

उंची अन् मजबूत शरीरयष्टीच्या जोरावर पोलार्ड अगदी सहजपणे चेंडू सीमापार पाठवायचा. 2005मध्ये त्यानं त्रिनिदाद अँड टॉबॅगो संघाचे प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर त्याची वेस्ट इंडिजच्या 19 वर्षांखालील संघात पाकिस्तान दौऱ्यासाठी निवड झाली. त्या दौऱ्यात पहिल्याच सामन्यात त्यानं 53 धावा कुटल्या. दुसऱ्या सामन्यातही अर्धशतकी खेळी केली, परंतु पुढील दोन सामन्यांत त्याला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.

7 / 12

2006च्या 19 वर्षांखालील क्रिकेट वर्ल्ड कप साठी त्याची संघात निवड झाली, परंतु त्याला चार डावांत 19 धावा करता आल्या. 2007 मध्ये त्यानं विंडीजच्या सीनियर वन डे व 2008 मध्ये ट्वेंटी-20 संघात पदार्पण केलं. आज तो वेस्ट इंडिजच्या ट्वेंटी-20 संघाचा कर्णधार आहे.

8 / 12

500 ट्वेंटी-20 सामना खेळणारा तो जगातील पहिलाच खेळाडू आहे. त्यानं 116 आंतरराष्ट्रीय वन डे सामन्यांत 3 शतकं व 11 अर्धशतकांसह 2564 धावा केल्या आहेत. 79 आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यांत 1277 धावा केल्या आहेत. शिवाय त्याच्या नावावर 91 आंतरराष्ट्रीय विकेट्सही आहेत.

9 / 12

जगभरातील विविध ट्वेंटी-20 लीगमध्ये त्याला प्रचंड डिमांड आहे. त्यानं आतापर्यंत अॅडलेड स्ट्रायकर, बार्बाडोस ट्रायडंट्स, कॅप कोब्रास, ढाका डायनामिक, ढाका ग्लॅडिएटर्स, कराची किंग्स, मेलबर्न रेनेगड्स, मुल्ताना सुल्तान, मुंबई इंडियन्स, पेशावर जाल्मी, समरसेट, साऊथ ऑस्ट्रेलिया, सेंट ल्युसिया स्टार्स, स्टँडफोर्ड सुपरस्टार, त्रिनबागो नाईट रायडर्स, त्रिनिदाद अँड टोबॅगो व वेस्ट इंडिज आदी संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. (Adelaide Strikers, Barbados Tridents, Cape Cobras, Dhaka Dynamites, Dhaka Gladiators, Karachi Kings, Melbourne Renegades, Multan Sultans, Mumbai Indians, Peshawar Zalmi, Somerset, South Australia, St Lucia Stars, Stanford Superstars, Trinbago Knight Riders, Trinidad & Tobago, West Indies)

10 / 12

त्यानं 541 ट्वेंटी-20 सामन्यांत 10797 धावा केल्या आहेत. त्यात 1 शतक, 53 अर्धशतकांसह 686 चौकार व 726 षटकार आहेत. ख्रिस गेलनंतर ट्वेंटी-20 सर्वाधिक धावांचा विक्रम त्याच्या नावावर आहे. 2012मध्ये त्यानं जेन्ना अलीशी विवाह केला अन् त्याला दोन मुलं व एक मुलगी आहे.

11 / 12

12 / 12

टॅग्स :किरॉन पोलार्डवेस्ट इंडिजमुंबई इंडियन्स