Cricket Buzz»फोटो गॅलरी »Happy Birthday MS Dhoni: धोनीची 'केस'स्टडी... कॅप्टन कूलच्या 10 कूssल हेअरस्टाइल्सHappy Birthday MS Dhoni: धोनीची 'केस'स्टडी... कॅप्टन कूलच्या 10 कूssल हेअरस्टाइल्स By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2018 4:09 PMOpen in App1 / 10महेंद्रसिंह धोनीने क्रिकेट करिअरला सुरुवात केली, तेव्हा अभिनेता जॉन अब्राहमकडून प्रेरणा घेत आपली हेअर स्टाईल अशी लांबलचक केली होती. सुरुवातीच्या काळात लांबलचक केसांमुळे धोनी चर्तेत आला होता.2 / 10धोनीच्या खेळाची जेवढी चर्चा झाली, तेवढीच चर्चा धोनीच्या मैदानावरील आणि मैदानाबाहेरील हेअरस्टाईलचीही झाली.3 / 10चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर धोनीने आपल्या जुन्या हेअरस्टाईलसह उंचावलेली ट्रॉफी. धोनीच्या या हेअरस्टाईलचे पाकिस्तानच्या माजी जनरल परवेज मुशर्रफ यांनीही कौतूक केलं होतं. 4 / 10कॅप्टन कूल धोनीचा हा कूल लूक. धोनीचा असाच एक लूक पाहून एका पत्रकार परिषदेत महिला पत्रकारानेही धोनीला, सर, वैसे आज आप बहुत कूल दिख रहे हो... असे म्हटले होते.5 / 10टीम इंडियाने 2011 साली विश्वचषक जिंकल्यानंतर धोनीने टक्कल केले होते. त्यावेळी टक्कल असलेल्या धोनीचा विश्वचषक उंचावल्याचा हा फोटो व्हायरल झाला होता.6 / 10धोनीचा न्यू-स्टाईल लूक सर्वांनाच घायाळ करणारा आहे. आयपीएल हंगामात हार्दीक पंड्याचाही असा लूक चर्चेचा विषय बनला होता. तर, धोनी आणि हार्दीकच्या लूकची तरुण वर्गाकडून मोठ्या प्रमाणात कॉपी करण्यात येत आहे. 7 / 10महेंद्रसिंह धोनीचा गॉगलवाला स्पोर्टस्टार लूक. धोनीच्या या लूकवर कित्येक तरुणी घायाळ आहेत. त्यामुळेच आयपीएलमधील सामन्यात एका तरुणीने धोनी इज माय फर्स्ट लव्ह असा बोर्ड पकडून धोनीला जाहीर प्रपोज केला होता.8 / 10धोनीचा हा ओल्ड एज लूकही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पांढरी दाढी वाढलेला, डोळ्यावर गॉगल चढवलेला आणि राऊंड कॅप घातलेला माहीचा ओल्ड एज लूक पाहून अनेकांना धक्काच बसला.9 / 10आयपीएल सामन्यांवेळी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा हटके लूक. धोनीच्या केस स्टडीतील अर्धी केसं गेलेला सरडास्टाईल लूक.10 / 10हा फोटो पाहून केवळ एवढचं म्हणता येईल..... 'कॅप्टन कूल' आणखी वाचा Subscribe to Notifications