Cricket Buzz»फोटो गॅलरी »Happy Birthday Rohit : रोहित शर्माचा फिल्मी अंदाज; गुडघ्यावर बसून रितिकाला केलेलं प्रपोजHappy Birthday Rohit : रोहित शर्माचा फिल्मी अंदाज; गुडघ्यावर बसून रितिकाला केलेलं प्रपोज By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 10:16 AMOpen in App1 / 9भारतीय संघाचा हिटमॅन अर्थात रोहित शर्मा याचा आज वाढदिवस. क्रिकेटच्या विक्रमापलिकडे रोहितची पर्सनल लाईफही बॉलिवूड चित्रपटासारखी आहे. रोहित अन् रितिका यांच्या लग्नाची गोष्ट अशीच मजेशीर आहे...2 / 9रितिका ही रोहितची मॅनेजर होती आणि या प्रोफेशनल नात्यातूनच हे प्रेम बहरलं. ही दोघं एकमेकांना सहा वर्षांपासून ओळखत होती. रितिका ही स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजर होती आणि ती रोहितच्या सर्व मिटींग याची नोंद ठेवायची3 / 9रितिका ही युवराज सिंगची मानलेली बहीण... रोहित व रितिका कामाच्या निमित्तानं अनेकदा भेटायचे. त्यानंतर त्यांच्या चांगल्या मैत्रीत रुपांतर झाले आणि हळूहळू दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले.4 / 9सहा वर्षांच्या प्रेमसंबंधांना त्यांनी लग्नाच्या नात्यात बांधण्याचा निर्णय घेतला. रोहितनं आपल्या आयुष्यातील या सर्वात मोठ्या निर्णयाचा क्षण अविस्मरणीय करण्याचा ठरवले.5 / 9बोरीवली स्पोर्ट्स क्लब येथून रोहितनं आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. तेथेच त्यानं गुडघ्यावर बसून हातात रिंग घेत रितिकाला लग्नाची मागणी घातली. रितिकानंही त्याला होकार दिला.6 / 9रोहितनं ट्विटरवरून त्याच्या साखरपुड्याची बातमी सर्वांना सांगितली. 3 जून 2015मध्ये दोघांनी साखरपुडा केला.7 / 913 डिसेंबर 2015मध्ये दोघांनी विवाह केला. मुंबईच्या ताज लँड हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. या लग्नाला क्रिकेटपटू बॉलिवूड सेलिब्रेटी आणि उद्योगपती उपस्थित होते.8 / 9मुंबई इंडियन्सचे मालक अंबानी यांनी या दोघांच्या विवाहाची ग्रँड पार्टी दिली होती. त्यात देशातील मोठमोठी व्यक्ती हजर होत्या.9 / 9या दोघांच्या लग्नाला चार वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आता त्यांच्या कुटुंबात समायरा ही गोड मुलगीही आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications