कपल गोल सेट करणारी जोडी; या स्टार क्रिकेटरची लव्ह स्टोरीही लय भारी!

क्रिकेटच्या मैदानातील कामगिरीशिवाय हा स्टार खेळाडू फिल्डबाहेरील वैयक्तिक गोष्टींमुळेही चर्चेत असतो. त्याची लव्ह स्टोरी अगदी फिल्मी वाटावी अशी आहे.

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर हा १६ ऑक्टोबरला आपला बर्थडे साजरा करतो. बीसीसीआयने (BCCI) खास पोस्ट शेअर करत त्याला ३३ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शार्दूल ठाकूर टीम इंडियाशिवाय आयपीएलमध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यातूनही खेळताना पाहायला मिळाले आहे. बॅटिंग आणि बॉलिंग दोन्हींत त्याने आपली धमक दाखवून दिली आहे.

फार कमी क्रिकेट चाहत्यांना माहिती असेल की, बॉलिंग ऑल राउंडरच्या रुपात ओळखला जाणाऱ्या शार्दूल ठाकूरच्या नावे एका ओव्हरमध्ये ६ सिक्सर मारण्याचा रेकॉर्डही आहे. २००६ मध्ये हॅरिस शिल्ड स्कूल क्रिकेट स्पर्धेत त्याने ही कमाल केली होती. ६ चेंडूत ६ षटकाराने बहरलेल्या खेळीत त्याने ७३ चेंडूत १६० धावा ठोकल्या होत्या.

क्रिकेटच्या मैदानातील कामगिरीशिवाय हा स्टार खेळाडू फिल्डबाहेरील वैयक्तिक गोष्टींमुळेही चर्चेत असतो. त्याची लव्हस्टोरी अगदी फिल्मी वाटावी अशी आहे.

शार्दुल ठाकूरनं २३ फेब्रुवारी २०२३ मध्ये बिझनेसवुमन आणि लाँग टाईम गर्लफ्रेंड मिताली परुलकर हिच्यासोबत लग्नगाठ बांधली.

शार्दूल आणि मिताली ही जोडी सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे. वेगवेगळे फोटो शेअर करत ही जोडी चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते. त्यांच्या जबरदस्त केमिस्ट्रीवर चाहतेही भरभरून प्रेम व्यक्त करत असतात.

अगदी शाळेपासून ते एकत्र होते. बालपणीचं दोघांच्यात घट्ट मैत्री झाली. मग हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सध्याच्या घडीला ही जोडी कपल सेट गोल सेट करणाऱ्या आघाडीच्या जोडींपैकी एक आहे.

एका बाजूला क्रिकेटच्या माध्यमातून शार्दूल ठाकूर मोठी कमाई करतो. दुसरीकडे त्याची पत्नी मिताली आपल्या स्वत:च्या व्यवसायातून कोट्यावधी कमावते. ठाण्यातील प्रसिद्ध बेकरीची ती मालकीण आहे.

सोशल मीडियावर या दोघांचा मोठा चाहतावर्ग आहे. मिताली देखील सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असून ती अनेकदा शार्दूलसोबतचे खास फोटो शेअर करत दोघांच्यातील प्रेमातील गोडवा दाखवून देताना दिसते.