Join us  

Happy Birthday Virat Kohli : विराटचं ३४ व्या वर्षात पदार्पण, पाहा कसा होता ‘चीकू’ ते ‘किंग कोहली’पर्यंतचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2022 8:57 AM

Open in App
1 / 10

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने 5 नोव्हेंबर 2022 रोजी 34 व्या वर्षात पदार्पण केले. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आज त्याचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. 5 नोव्हेंबर 1988 रोजी जन्मलेला कोहली क्रिकेट जगतात त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो.

2 / 10

मग ते टेस्ट क्रिकेट असो वा वनडे किंवा टी-२० तिन्ही फॉर्मेटमध्ये विराटनं आपल्याला सिद्ध केले आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अंडर-19 विश्वविजेता बनला, पण त्यानंतर विराट कोहलीला कर्णधार म्हणून आयसीसी स्पर्धेत जेतेपद पटकावता आले नाही.

3 / 10

विराट कोहलीने कर्णधार असताना टीम इंडियाला भलेही आयसीसी ट्रॉफी जिंकून दिली नसली तरी त्याची फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि अधूनमधून गोलंदाजीमुळे तो संघाला आपले शंभर टक्के देण्यास मागेपुढे पाहत नाही. 2014 मध्ये कसोटी संघाची कमान मिळाल्यानंतर त्याने संघाला विजयाबरोबरच परदेशी भूमीवरही विजय मिळवण्यास शिकवले.

4 / 10

विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अनेक मोठे यश संपादन केले. विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया टेस्टमध्ये नंबर-1 टीम बनली, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचली. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या संघांना त्याच्याच भूमीवर पराभूतही केले.

5 / 10

2017 मध्ये तो भारतीय संघाचा मर्यादित षटकांचा कर्णधारही बनला. मात्र, येथेही संघाला त्याच्या नेतृत्वाखालील आयसी स्पर्धेत फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. पण कोहलीने आपल्या कर्णधारपदाखाली संघाला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले. विराट कोहलीने एमएस धोनीनंतरचा भारताचा दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून T20 संघाचा कर्णधारपदाचा कार्यकाळ पूर्ण केला.

6 / 10

विराटचा जन्म 15 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्लीत झाला. सध्या विराट आपला 34 वा वाढदिवस साजरा करत असून तो ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या T20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघाचा भाग आहे. या स्पर्धेत विराट कोहलीच्या बॅटनं जबरदस्त कामगिरी केली आहे. या स्पर्धेत तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही ठरला आहे.

7 / 10

सुरुवातीच्या काळात विराट कोहलीला त्याचे सहकारी खेळाडू चीकू नावाने हाक मारायचे. चंपक, कॉमिक्समधील पात्राच्या नावावरून त्याचे चीकू नाव पडले. आपल्या नेतृत्वाखाली अंडर-19 टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवणाऱ्या विराट कोहलीने 20 ऑगस्ट 2008 रोजी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

8 / 10

त्यानंतर 4 वर्षांतच तो संघाचा महत्त्वाचा सदस्य म्हणून उदयास आला. मात्र, 2012 मध्ये विराट कोहलीने आपल्या फीट ठेवण्याचा निर्णय घेतला आणि तो भारतीय संघाच्या अन्य खेळाडूंपेक्षाही अधिक फिट आहे. विराट कोहली 2012 पासून फिटनेसमुळे क्वचितच एकाद्या सामन्यातून बाहेर पडला असेल. अनेक दिग्गज क्रिकेटपटूही विराटकडे कसोटी क्रिकेटचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून पाहतात.

9 / 10

477 आंतराष्ट्रीय सामने, 24350 आंताराष्ट्रीय धावा 2011 आयसीसी वर्ल्ड कप आणि 2013 आयसीसी चॅम्पिअनशिप ट्रॉफी विजेता, भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि आधुनिक काळातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक विराटला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असे म्हणत बीसीसीआयनेदेखील त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

10 / 10

विराट कोहलीने चीकूपासून किंग आणि ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइमपर्यंत घेतलेली मेहनत जगातील प्रत्येक युवा खेळाडूसाठी एक उदाहरण आहे. कोहली हा तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान आहे. वयाच्या 34 व्या वर्षीही कोहलीचा फिटनेस इतका जबरदस्त आहे की तो अजूनही त्याच्या निम्म्या वयाच्या खेळाडूंशी स्पर्धा करू शकतो.

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघ
Open in App