Raksha Bandhan Special : स्टार इंडियन क्रिकेटर्स अन् त्यांचे बहिणीसोबत असणाऱ्या खास बॉन्डिंगची गोष्ट

धोनीपासून ते अगदी विराट कोहलीपर्यंतच्या स्टार क्रिकेटर्सच्या यशात त्यांच्या बहिणीचा वाटा हा अगदी मोलाचा राहिला आहे.

क्रिकेटर अजिंक्य रहाणे याच्या बहिणीच नाव अपूर्वा असं आहे. या बहिण भावाचं नातही अगदी दृष्ट लागण्याजोगं आहे.

दीपक चाहर आणि मालती या भावंडामधील प्रेमही अनेकदा चर्चेचा विषय राहिले आहे. दीपकच्या प्रेमाच सेटिंग लावण्यातही मालतीनंच पुढाकार घेतला होता.

अर्जुन तेंडुलकर आणि सारा तेंडुलकर ही यांच्यातील नातंही एकदम खास आहे. सारामध्ये छोट्या भावाच्या आयपीएल पदार्पणाची जी उत्सुकता दिसली ती गोष्ट दोघांच्यातील बॉन्डिंगचा एक खास नजाराच दाखवून देणारी होती.

क्रिकेटर श्रेयस अय्यरच्या बहिणीचं नाव श्रेष्ठा असं आहे. ती एक डान्सर आणि कोरिओग्राफर आहे. अनेकदा ती श्रेयस अय्यरलाही डान्सचे धडे देताना दिसली आहे.

भारतीय गोलंदाजीतील हुकमी एक्का जसप्रीत बुमराह याच्या बहिणीचं नाव जुहीका असं आहे. ती बुमराहपेक्षा मोठी असून ती पेशाने शिक्षिका आहे. फोटोत या दोघांमधील बॉन्डिंग किती खास आहे, त्याची झलक पाहायला मिळते.

भारताचा युवा स्टार विकेट किपर बॅटर रिषभ पंत आणि त्याची बहिण साक्षी यांच्यातील नातंही एकदम खास आहे. पंत देशांतर्गत क्रिकेट खेळायचा तेव्हा त्याची बहिण जवळपास प्रत्येक सामन्याला त्याला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियमवर हजेरी लावायची.

भारतीय संघातील प्रिन्स शुबमन गिल याची बहिण शाहनील गील सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. अनेकदा ती शुबमनसोबत खास व्हिडिओही शेअर करताना दिसते.

किंग कोहलीच्या आयुष्यातही त्याच्या बहिणीचा रोल महत्त्वाचा राहिला आहे. कोहलीच्या बहिणीचे नाव भावना कोहली धिंग्रा असं आहे. जर तुम्ही तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नजर टाकली तर तुम्हाला तिचं भावाप्रती असणारं प्रेम सहज दिसून येईल.

महेंद्रसिंह धोनी जयंती या बहिण भावातील नांतही खासच आहे. भारतीय संघाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी हा खूपच खडतर प्रवास करत यशाच्या शिखरावर विराजमान झाला. त्याच्या यशात बहिणीचा वाटाही खूप मोलाचा आहे. धोनीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटातूनही क्रिकेटर अन् त्याची बहिण जयंती यांच्यातील खास बॉन्डिंग दाखवण्यात आले होते.