Virat Kohli Harbhajan Singh: विराट कोहलीला फिटनेसच्या बाबतीत 'हा' ३१ वर्षीय खेळाडू सहज मागे टाकेल- हरभजन सिंग

पाहा, तुम्हाला पटतंय का हरभजन सिंगचं मत

Virat Kohli Harbhajan Singh: फिटनेसच्या बाबतीत टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली याच्याशी बरोबरी करणं कठीण आहे. विराट कोहलीने क्रिकेटमध्ये फिटनेसला एक स्थान मिळवून दिलं आहे.

टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये फिटनेसची आवड निर्माण करण्यात विराट कोहलीचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजीसह आता फिल्डिंगमध्येही नाव कमावत आहे.

टीम इंडियाचे खेळाडू हल्ली बरेच तंदुरुस्त दिसतात, त्यात विराट कोहलीचे मोठे योगदान आहे. पण विराटलाही फिटनेसमध्ये मागे टाकेल असा एक स्थानिक खेळाडू IPLमध्ये खेळतोय, असा दावा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने केला आहे.

विराट कोहलीच्या फिटनेसला मानणारे आणि त्याच्या या गोष्टीचं कौतुक करणारे परदेशी खेळाडू आहेत. अशा परिस्थितीत हरभजन सिंगने एका ३१ वर्षीय खेळाडूचा फिटनेस हा विराटपेक्षाही भारी असल्याचा दावा केला आहे.

हरभजनने कॉमेंट्री करताना एक धाडसी विधान केलं. हरभजन म्हणाला की फिटनेसच्या बाबतीत राहुल त्रिपाठी हा खेळाडू विराट कोहलीला मागे टाकू शकतो. हरभजनने याबद्दल कारणही सांगितलं.

कॉमेंट्रीदरम्यान हरभजन म्हणाला, 'मी राहुल त्रिपाठीला ट्रेनिंग करताना पाहिले आहे. हा खेळाडू खूप उत्साही आहे. तो जिममध्ये जवळपास प्रत्येक व्यायाम प्रकार करतो, जो इतर कोणीही करू शकत नाही. तो फिटनेसबाबत खूपच गंभीर आहे. माझ्या मते विराट कोहलीला फिटनेसच्या बाबतीत मागे टाकणारा खेळाडू राहुल त्रिपाठी असू शकेल"