"काही बाहेरील लोक होते जे माझ्या बाजूनं नव्हते. ते पूर्णपणे माझ्या विरोधातही होते असंही म्हणता येईल. मी ज्या प्रकारे गोलंदाजी करत होतो आणि पुढे जात होतो, हे त्याचं कारण आहे. मी ३१ वर्षांचा होतो तोवर मी ४०० विकेट्स घेतल्या होत्या आणि अजून ४-५ वर्षे खेळण्याचा विचारही होता. परंतु तसं झालं असतं तर मी अजून १००-१५० विकेट्स घेऊ शकलो असतो," असंही तो म्हणाला.