Join us  

Hardik Pandya: कोट्यवधीच्या घड्याळामुळे अडचणीत सापडलेला हार्दिक पांड्या आहे उंची घड्याळांचा शौकिन, असं आहे त्याच्याकडील कलेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 3:01 PM

Open in App
1 / 8

यूएईवरून येताना सोबत आणलेले कोट्यवधी रुपयांचं घड्याळ सीमाशुल्क विभागाने ताब्यात घेतल्याने भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या अडचणीत सापडला आहे. घड्याळामुळे अडचणीत सापडलेला हार्दिक पांड्या उंची घड्याळांचा शौकिन असून, त्याच्याकडे ३८ लाख रुपयांपासून ते ३ कोटी रुपयांपर्यंतची घड्याळे त्याच्याकडील कनेक्शनमध्ये आहे.

2 / 8

हार्दिक पांड्या हा घड्याळांचा डायहार्ट लव्हर आहे. तसेच त्याच्याकडे जगभरातील महागडी आणि लक्झरी घड्याळे आहेत.

3 / 8

२०२० मध्ये हार्दिक पांड्याने फिलिप नॉटिलस प्लॅटिनम 5712R घड्याळ लॉन्च झाल्यावर लगेचच खरेदी केले होते. त्याने हे घड्याळ कस्टमाईज केले आणि त्यामध्ये काही हिरे जडवून घेतले होते. या घड्याळाची किंमत सुमारे १.६५ कोटी रुपये एवढी आहे.

4 / 8

२०१९ मध्ये हार्दिक पांड्याचा पाटेक फिलिपचे एक महागडे घड्याळ हातात घातलेला फोटो समोर आला होता. हे घड्याळ १८के व्हाईट गोल्ड मॉडेल आहे. या घड्याळ्याचा डायलवर २५५ हिरे जडवलेले होते. डायल प्लेट १८ कॅरेट गोल्ड पासून बनवलेली आहे. या घड्याळाच्या बेल्ट आणि डायलवर मिळून १३४५ हिरे जडवलेले आहेत. त्यांची किंमत सुमारे २.७ कोटी रुपये आहे.

5 / 8

हार्दिक पांड्याकडे रोलेक्स कॉस्मोग्राफ डेटोनाचे १८ कॅरेट यलो गोल्ड आय ऑफ टायगर घड्याळ आहे. त्याची किंमत एक कोटी रुपयांच्या आसपास आहे.

6 / 8

तसेच हार्दिककडे महागडे स्विस घड्याळ ऑडेमर्स पिगुएटचे रॉय ओकचे सेल्फवायंडिंग क्रोनोग्राफ रोज गोल्ड सुद्धा आहे. हार्दिकने ते ३८ लाख रुपयांना खरेदी केले होते.

7 / 8

हार्दिकजवळ ऑडेमर्स पिगुएटचे रॉयल ओख ऑफशोर १८ कॅरेटचे रोज गोल्डचे एडिशनसुद्धा आहे. ज्याची किंमत ८५ पासून ९५ लाख रुपयांपर्यंत आहे.

8 / 8

तसेच त्याच्याजवळ जगातील दुर्मीळ अशी रोलेक्स घड्याळांपैकी एक डे डेट ४० एमएम यलो गोल्ड घड्याळही आहे. ज्याची किंमत ८९ लाख रुपयांच्या आसपास आहे.

टॅग्स :हार्दिक पांड्याभारतीय क्रिकेट संघ
Open in App