'अलग प्रकार का आदमी है!' हार्दिक-नताशाच्या पहिल्या भेटीचा भन्नाट किस्सा

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानं रविवारी सर्वांना सुखद धक्क दिला. त्यानं प्रेयसी नताशा स्टँकोव्हिच गर्भवती असल्याची गोड बातमी सोशल मीडियावरून शेअर केली.

ही बातमी सर्वांना सांगताना त्यानं दोन फोटो शेअर केला... एका फोटोत त्यानं नताशाच्या पोटावर हात ठेवला आहे, तर दुसऱ्या फोटोत दोघांनी गुपचुप लग्नही केल्याचं समजत आहे.

2020च्या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय खेळाडूनं सर्वांना मोठा धक्का दिला होता.

त्यानं दुबईत मोजक्या मित्रांच्या साक्षीनं नताशासोबत साखरपुडा केला. सोशल मीडियावर जेव्हा त्यानं साखरपुड्याचं जाहीर केलं तेव्हा सर्वांना धक्काच बसला.

हार्दिक पांड्याच्या आई-वडिलांनाही याची कल्पना नव्हती. हार्दिक म्हणाला,''मी साखरपुडा करणार आहे, याची आई-वडिलांनाही कल्पना नव्हती.''

''साखरपुड्याच्या दोन दिवस आधी मी कृणालला सांगितलं होतं. माझ्या आयुष्यात कोणीतरी आलं आहे आणि मी तिच्यावर प्रेम करतो आणि तिच्याशी लग्न करायचं आहे. त्यानं मला पाठींबा दिला आणि म्हणाला तुला जे हवं ते कर,''असं हार्दिकनं सांगितले.

हर्षा भोगले यांच्याशी एका कार्यक्रमात बोलताना हार्दिकनं नताशासोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला.

तो म्हणाला,''मी कोण आहे, हेही तिला माहीत नव्हतं. एका ठिकाणी गळ्यात चेन, हातात घड्याळ असा मी वेश केला होता. तेव्हा तिला वाटलं की, अलग प्रकार का आदमी आया!''

''त्यानंतर आम्ही भेटत राहिलो. एकमेकांबद्दल जाणून घेतलं. त्यानंतर डेटिंग करू लागलो. 31 डिसेंबरला साखरपुडा केला,'' असे हार्दिकनं सांगितले.

Read in English