भारतीय टीमचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या सध्या दुखापतीतून सावरत आहे. क्रिकेट मैदानापासून दूर असला तरी त्याची चर्चा सोशल मीडियावर होत असते. आराम घेत असला तरी हार्दिक आता WWE रिंगणात धुमाकूळ घालताना दिसत आहे.
WWE रेसलर कार्मेलो हायेस (Carmelo Hayes) हा जवळपास हार्दिक सारखाच दिसतो. या कार्मेलो हायेसनेच हार्दिक पांड्याला टॅग करत ट्वीट केले आहे. यामध्ये कार्मेलो खूप हैराण झाल्याचे दिसत आहे.
कार्मेलो हायेस हा अमेरिकेचा एक रेसलर आहे. तो WWE- एनएक्सटी मध्ये तो खेळतो. त्याचे खरे नाव ख्रिश्चिअन ब्रिघम आहे. मात्र रिंगमध्ये तो कार्मेलो या नावाने खेळतो. त्याचे वय २७ वर्षे आहे. सध्या तो एनएक्सटी-नॉर्थ अमेरिकी चँपियन आहे.
कार्मेलोने एक ट्विट केले आहे. यामध्ये मंगळवारी त्याने पांड्याला टॅग केले आणि म्हटले की, माझ्यामुळे हार्दिक पांड्या भारतात ट्रेंड करतोय, खूप खूप प्रेम.
हार्दिकने या ट्विटला अद्याप रिप्लाय दिलेला नाही. मात्र, त्याच्या फॅन्सनी खूप काही लिहीले आहे. अनेकांनी त्याला ट्रेंडसेटर म्हटले. काहींनी दोघांचे फोटो जोडून ते पोस्टही केले.
कार्मेलो सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. तो त्याच्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ ट्विट करत असतो. इन्स्टाग्रामवरही त्याचे ४६ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.