भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बाप बनणार आहे. त्यानं इंस्टाग्रामवरून ही गोड बातमी दिली. हार्दिकनं 2020 वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुबईत बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिचसह साखरपुडा केला होता. त्यानंतर हे कपल सोबतच आहेत. लॉकडाऊनमुळे नताशा ही पांड्या कुटुंबीयांसोबतच राहत आहे. रविवारी हार्दिकनं नताशासोबतचा फोटो पोस्ट करून ही गोड बातमी दिली. मुंबई इंडियन्स, विराट कोहलीसह सर्वांनी त्यांचं अभिनंदन केलं. पण, हार्दिक-नताशाच्या गुड न्यूजनंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली अऩ् त्याची पत्नी अनुष्का शर्मा ट्रोल होत आहेत. या भन्नाट मीम्स पाहून तुम्हीही पोट धरून हसाल...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 10:25 AM2020-06-01T10:25:14+5:302020-06-01T10:29:16+5:30