चार भूमिका पार पाडणारी भारताची 'सुपरस्टार', पण आता वर्ल्ड कपच्या संघातूनही डच्चू, कारण...

harleen deol cricketer : ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी भारताच्या संघाची घोषणा झाली.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) महिलांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी आपल्या संघाची घोषणा केली. टीम इंडिया पुन्हा एकदा हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात मोठ्या व्यासपीठावर खेळताना दिसेल.

तमाम भारतीयांचे स्वप्न पूर्ण करण्यात महिला शिलेदारांना यश येते का हे पाहण्याजोगे असेल. टीम इंडियाचा संघ जाहीर झाला अन् पुन्हा एकदा एक नाव चर्चेत आले ते म्हणजे हरलीन देओल.

एकेकाळी फलंदाज, यष्टीरक्षक, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण अशा विविध भूमिकेत दिसणारी हरलीन मागील मोठ्या कालावधीपासून क्रिकेटपासून दूर आहे. महिला प्रीमिअर लीग २०२४ च्या मध्यापासून हरलीन क्रिकेटपासून दूर आहे.

गुजरात जायंटसच्या संघाचे प्रतिनिधित्व करणारी हरलीन अद्याप पुनरागमन करू शकली नाही. दुखापतीआधी ती धावांसाठी संघर्ष करताना दिसली. महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामात हरलीनने काही सामने खेळले मात्र एकाही सामन्यात ती प्रभावी कामगिरी करू शकली नाही.

फेब्रुवारी २०१९ मध्ये भारतीय संघाचे तिकीट मिळवणाऱ्या हरलीनने काही सामन्यांमध्ये चमक दाखवली. तिने इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात सीमारेषेजवळ घेतलेला अप्रतिम झेल आजही तिची ओळख सांगतो.

विशेष बाब म्हणजे हरलीन शेवटच्या वेळी २०२३ मध्ये टीम इंडियासाठी खेळली होती. तेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने शानदार विजय मिळवला होता.

आपल्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घालणारी, डान्स करुन चर्चेत येणारी तर कधी ग्लॅमरस फोटो पोस्ट करुन मॉडेलच्या शैलीत झळकणारी हरलीन आता थेट WPL २०२५ मध्ये दिसण्याची शक्यता आहे.

आगामी ट्वेंटी-२० विश्वचषकात ती राखीव खेळाडू म्हणून भारतीय संघासोबत यूएईला जाईल असे अपेक्षित होते. मात्र, उमा छेत्री, तनुजा कान्वेर आणि सायमा ठाकूर यांना राखीव खेळाडू म्हणून संधी मिळाली.