Join us  

सौंदर्यात अभिनेत्रीपेक्षा कमी नाही हॅरी ब्रूकची गर्लफ्रेंड; तडाखेबंद शतक ठोकल्यानंतर म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 7:59 AM

Open in App
1 / 8

सनरायझर्स हैदराबादने सलग दुसरा विजय मिळवताना कोलकाता नाइट रायडर्सला (केकेआर) त्यांच्याच मैदानावर २३ धावांनी नमवले. यासह हैदराबादने गुणतालिकेत दोन स्थानांनी प्रगती करत सातवे स्थान पटकावले. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर हैदराबादने २० षटकांत ४ बाद २२८ धावांचा डोंगर उभारला. यानंतर त्यांनी कोलकाताला २० षटकांत ७ बाद २०५ धावांवर रोखले.

2 / 8

हॅरी ब्रूकने झळकावलेले तडाखेबंद नाबाद शतक हैदराबादच्या विजयात निर्णायक ठरले. हॅरी ब्रूकने शतक झळकावत हैदराबादला द्विशतकी धावसंख्या उभारुन दिली. ब्रूकने आयपीएलमधील आपल्या पहिल्या अर्धशतकी खेळीचे शतकात रूपांतर केले. तसेच, ब्रूकने झळकावलेले शतक यंदाच्या सत्रातील पहिलीच शतकी खेळी ठरली.

3 / 8

हॅरी ब्रूकने त्याची गर्लफ्रेंड लूसी लेलससमोर आयपीएलमधील पहिले शतक ठोकले. या खेळीनंतर लूसीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

4 / 8

हॅरी ब्रूक आणि लूसी लेलस ३ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्याने २०२० मध्ये पहिल्यांदा त्याच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला होता.

5 / 8

लूसी लेलस सोशल मीडियावर आहे पण तिचे इंस्टाग्राम अकाउंट प्राइवेट आहे. पण ब्रुक तिच्यासोबतचे फोटो नेहमी शेअर करत आहे.

6 / 8

हॅरी ब्रूक शतकानंतर म्हणाला की, माझी गर्लफ्रेंड येथे आहे. परंतु माझे उर्वरित कुटुंब नुकतेच निघून गेले आहे. ते गेल्यावर हे घडणार हे मला माहीत होतं. मला खात्री आहे की ते सर्व माझ्या या खेळीमुळे खूप आनंदी असतील.

7 / 8

हॅरी ब्रूकने ५५ चेंडूत शतक पूर्ण केले. या खेळीत त्याने १२ चौकार आणि ३ षटकार मारले.

8 / 8

हॅरी ब्रुकला खरेदी करण्यासाठी सनरायझर्स हैदराबादने १३.२५ कोटी रुपये खर्च केले आहे. मात्र स्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये हॅरीची बॅट पूर्णपणे शांत राहिली.

टॅग्स :आयपीएल २०२३सनरायझर्स हैदराबादसोशल व्हायरल
Open in App