Harshal Patel breaks silence : IPL 2022साठी RCBनं रिटेन न केल्याच्या निर्णयावर हर्षल पटेलनं सोडलं मौन; विराट कोहलीबद्दल म्हणाला...

Harshal Patel breaks silence : इंडियन प्रीमिअर लीगचे ( IPL 2021) १४ वे पर्व युवा गोलंदाज हर्षल पटेल यानं गाजवलं. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा ( Royal Challengers Bangalore) सदस्य असलेल्या हर्षलला रिटेन नाही केलं.

Harshal Patel breaks silence : इंडियन प्रीमिअर लीगचे ( IPL 2021) १४ वे पर्व युवा गोलंदाज हर्षल पटेल यानं गाजवलं. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा ( Royal Challengers Bangalore) सदस्य असलेल्या हर्षलनं सर्वाधिक विकेट्स घेताना पर्पल कॅपचा मान पटकावला.

हर्षल पटेलनं २०२१च्या पर्वात १५ सामन्यांत ३१ विकेट्स घेतल्या आणि संघाला प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवून दिला. पण, तरीही RCBनं त्याला पुढील पर्वासाठी ( IPL 2022) संघात रिटेन केलं नाही. त्यामुळे हर्षल निराश नक्कीच झाला असेल. पण, आज हर्षलनं RCBनं रिटेन न केल्याच्या निर्णयावर मौन सोडलं.

आयपीएलच्या एकाच पर्वात सर्वाधिक ३१ विकेट्स घेणारा हर्षल पटेल हा सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज ठरला. त्यानं जसप्रीत बुमराहनं मागील पर्वात नोंदवलेला २७ विकेट्सचा विक्रम मोडला. ( Most wickets by Indians in an IPL season). भुवनेश्वर कुमारनं ( SRH) २०१७मध्ये २६ , जयदेव उनाडकटनं २०१७ मध्ये ( RPS) २४ व हरभजन सिंग २०१३मध्ये ( MI) २४ विकेट्स घेतल्या होत्या.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं विराट कोहली ( 15 कोटी), ग्लेन मॅक्सवेल ( 11 कोटी), मोहम्मद सिराज ( 7 कोटी) या खेळाडूंना कायम राखले आणि आयपीएल लिलावासाठी त्यांच्या पर्समध्ये ५७ कोटी शिल्लक आहेत.

बीसीसीआयनं प्रत्येकी फ्रँचायझीला ९० कोटींची पर्स दिली होती आणि त्यातच त्यांना संघबांधणी करायची होती. बीसीसीआयनं ८ फ्रँचायझींना चार खेळाडू रिटेन करण्यासाठी ४२ कोटींचा बजेट दिला होता. ही रक्कम त्यांच्या सॅलरी पर्समधून वजा केली गेली. समजा एखाद्या फ्रँचायझीनं चार खेळाडू रिटेन केले तर त्यांच्या पर्समधून ४२, तीन खेळाडू रिटेन केले तर ३३ कोटी, दोन खेळाडू रिटेन केल्यास २४ कोटी आणि एक खेळाडू रिटेन केल्यास १४ कोटी वजा केले जातील. अनकॅप खेळाडूला रिटेन केल्यास ४ कोटी वजा झाले.

RCBचे संचालक माइक हेसन यांनी याबाबतीत आपल्याशी चर्चा केल्याचे हर्षलने सांगितले. तो म्हणाला, मला रिटेन केलं गेलं नाही तेव्हा माइक हेसन यांचा मला कॉल आला आणि पर्स मॅनेजमेंटसाठी हा निर्णय घ्यावा लागला असे त्यांनी सांगितले. त्यांना मला पुन्हा RCBच्या ताफ्यात पाहायचे आहे. मलाही त्यांच्याकडून पुन्हा खेळायचे आहे. RCB आणि २०२१ वर्षानं माझं आयुष्य बदललं.

विराट कोहली व एबी डिव्हिलियर्स यांच्याबद्दल हर्षल म्हणाला, त्यांच्या मैदानावरील कामगिरीमुळे मी प्रभावीत आहे. त्यांच्याकडे प्रचंड दबाव झेलण्याची क्षमता आहे. त्यांच्याकडून मी हेच शिकलो आहे.