Cricket Buzz»फोटो गॅलरी »Asia Cup 2022: ...म्हणून हसन अली म्हणतो 'I Love India', फोटोंद्वारे पाहा भारतासोबतचे खास कनेक्शनAsia Cup 2022: ...म्हणून हसन अली म्हणतो 'I Love India', फोटोंद्वारे पाहा भारतासोबतचे खास कनेक्शन By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 3:48 PMOpen in App1 / 6पाकिस्तानी संघाचा वेगवान गोलंदाज हसन अलीचे भारतासोबत खास कनेक्शन आहे. हसन आणि त्याची पत्नी सामिया हे दोघे सर्वप्रथम एका रेस्टॉरंटमध्ये डिनर पार्टीदरम्यान भेटले होते. लवकरच दोघांची मैत्री झाली आणि नंतर दोघांनीही घरच्यांच्या संमतीने लग्न केले. दोघांचे लग्न दुबईत झाले होते. लक्षणीय बाब म्हणजे सामिया ही मूळची भारतातील आहे. 2 / 6हसन अली सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. तो अनेकदा त्याची पत्नी आणि मुलीसोबतचे फिरायला गेलेले आणि फंक्शन्सचे फोटो शेअर करत असतो. तसेच व्हिडीओ शेअर करून तो चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. 3 / 6पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली हा मागील मोठ्या कालावधीपासून क्रिकेटपासून दूर आहे. अनेकवेळा तो आणि पत्नी सामिया यांचे विदेशातील फोटो समोर आले होते. दोघेही सोशल मीडियावर वाढदिवस आणि ईद यांसारख्या प्रसंगांचे फोटो शेअर करतात.4 / 6हसन अली खराब फॉर्ममुळे काही काळ संघाबाहेर होता आणि आता त्याला आशिया चषकामध्ये शेवटच्या क्षणी संधी मिळाली आहे. पाकिस्तानी संघातील वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी याच्या जागेवर अलीला संधी मिळेल अशी चर्चा होती मात्र तसे झाले नाही. आफ्रिदीच्या जागी मोहम्मद हसनैनला पाकिस्तानी संघात स्थान मिळाले.5 / 6 हसन अलीच्या इंन्स्टाग्रामवरही कविता आणि कवितांच्या ओळी आहेत हे फारच कमी क्रिकेट चाहत्यांना माहीत आहे. त्याची पत्नी सामिया आरजूला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याने खास एक कविता शेअर केली होती. 6 / 6पत्नीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे हसन अलीला अनेकदा ट्रोलर्सचा सामना करावा लागला आहे. तसेच त्याने नेहमीच कट्टरपंथी ट्रोल्सचा सामना केला आहे आणि त्यांना बरेच काही सांगितले आहे. मागील वर्षी पार पडलेल्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात हसन अलीकडून एक झेल सुटला होता. त्यामुळे पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर झाला होता. यावरून देखीन अलीला ट्रोलर्सचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications