लॉर्ड्स : क्रिकेटची पंढरी म्हणजे इंग्लंडमधील लॉर्ड्स हे मैदान. या मैदानात सामना पाहण्याचे स्वप्न हे प्रत्येक चाहत्याचे असते.
क्वीन्सटाऊन : न्यूझीलंडमधील एक सुंदर स्टेडियम म्हणून क्वीन्सटाऊनचे नाव घेता येईल. कारण या मैदानाच्या बाजूला असलेल्या पर्वतरांगा मन मोहून घेतात.
धरमशाला क्रिकेट ग्राऊंड : हिमाचल प्रदेश येथील धरमशाला क्रिकेट ग्राऊंड हे भारतातील सर्वात सुंदर मैदानांपैकी एक आहे.
गॉल : श्रीलंकेतील गॉल येथे असलेले हे मैदान साऱ्यांनाच आवडेल असे आहे. कारण या मैदानाच्या दोन्ही बाजूंना समुद्र आहे.