Join us

Ashish Nehra नं भारताच्या T20 संघाचा कर्णधार म्हणून कोणाचं सुचवलं नाव? ऐकून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 18:50 IST

Open in App
1 / 9

T20 विश्वचषकानंतर भारतीय संघाला नवा कर्णधार मिळणार आहे. भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली (Team India Virat Kohli) यानं यापूर्वीच विश्वचषक स्पर्धेनंतर आपण T20 संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याचं जाहीर केलं आहे.

2 / 9

दरम्यान, भारताच्या T20 संघाचा नवा कर्णधार कोण असावा यावर भारतीय संघाचा माजी गोलंदाज आशिष नेहरा (Former Cricketer Ashish Nehra) यानं आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यानं यासाठी अशा खेळाडूचं नाव सुचवलं आहे जे ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्काही बसू शकतो.

3 / 9

भारताच्या T20 संघाचं नेतृत्व जसप्रीत बुमराह याला देण्यात यावं असं मत आशिष नेहरा यानं व्यक्त केलं. तो टीम इंडियासाठी तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळणारा एकमेव खेळाडू आहे. तर दुसरीकडे केएल राहुल आणि ऋषभ पंतला सध्या कोणत्या ना कोणत्या फॉर्मेटमध्ये बाहेर बसावं लागलं आहे, असं तो म्हणाला. क्रिक बझशी संवाद साधताना त्यानं आपलं मत व्यक्त केलं.

4 / 9

'रोहित शर्मानंतर आम्ही ऋषभ पंत आणि केएल राहुल यांची नावं ऐकत आहोत. ऋषभ पंत अनेकदा टीमसोबत राहिला आहे. परंतु तौ मैदानावर ड्रिंक्सही घेऊन गेलाय आणि टीमच्या बाहेरही होता,' असं तो म्हणाला.

5 / 9

'मयंक अग्रवालला दुखापत झाल्यामुळे केएल राहुलचं पुनरागमन झालं आहे. तर अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराह हा एक पर्याय असू शकतो. जसं अजय जडेजानंही सांगितलं, तो एर चांगला खेळाडू आहे, त्याची जागा निश्चित अशते आणि तो तिन्ही फॉर्मेटच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असतो. जलदगती गोलंदाज कधीही संघाचा कर्णधार बनू शकत नाही, असं कोणत्याही पुस्तकात लिहिलं नाही,' असं त्यानं नमूद केलं.

6 / 9

रिपोर्ट्सनुसार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांचं नाल कर्णधारपदाच्या शर्यतीत पुढे आहे. परंतु आतापर्यंत बीसीसीआयनं याची अधिकृत घोषणा केलेली नाही. येत्या काही दिवसांत या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

7 / 9

संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे संयुक्तपणे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा खेळवण्यात येत आहे. भारतीय संघ स्पर्धेतील पहिला सामना २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. पण, ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीची ( Virat Kohli) ही अखेरची स्पर्धा आहे. या स्पर्धेनंतर ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा विराटनं आधीच केली आहे.

8 / 9

विराटने ट्विटरवर पत्र ट्वीट केलं होतं. त्यात त्याने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केलं होतं. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह, कोच रवी शास्त्री आणि सहकारी रोहित शर्मा यांच्यासोबत चर्चा करुन हा निर्णय घेतल्याचे कोहलीनं म्हटलं होतं.

9 / 9

गेल्या आठ- नऊ वर्षांतील कामाचे ओझे पाहता असे करण्याची गरज होती. मी मागच्या ५-६ वर्षांपासून तिनही प्रकारात नियमितपणे नेतृत्व सांभाळत आहे. वन डे आणि कसोटी संघाचे पूर्णपणे नेतृत्व करण्यासाठी स्वत:ला अधिक ‘स्पेस’ देणं गरजचं वाटत असल्यामुळे मी T20 क्रिकेटचं नेतृत्व स्वत:कडे ठेवू इच्छित नाही अशी प्रतिक्रिया विराट कोहली यानं दिली होती.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघविराट कोहलीआशिष नेहरा