इंग्लंड- वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली. इंग्लंडनं कसोटी मालिकेत 2-1 असा विजय मिळवला आणि आता पाकिस्तानचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना इंग्लंडनं जिंकला. आंतरराष्ट्रीय कसोटीला सुरुवात झाल्यामुळे पुन्हा एकदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिका अन् सर्वाधिक धावा, विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. पाकिस्तानचा बाबर आझम यानं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीवर कुरघोडी केली आहे. शिवाय त्याची फलंदाजी सरासरी ही अव्वल दहा फलंदाजांपेक्षाही अधिक आहे. चला जाणून घेऊया जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील टॉप टेन फलंदाज..
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 12:19 PM2020-08-10T12:19:02+5:302020-08-10T12:29:52+5:30