फक्त एक शतकवीर! ICC स्पर्धेच्या फायनलमध्ये सर्वोच्च खेळी करणारे ७ भारतीय फलंदाज

फायनलमध्ये सर्वोच्च धावसंख्या करणाऱ्या आघाडीच्या ७ फलंदाजांपैकी फक्त एकानेच साधला शतकी डाव, ते शतकही ठरलेले व्यर्थ

आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताकडून सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम हा सौरव गांगुलीच्या नावे आहे. २५ वर्षांपूर्वी २००० च्या हंगामातील चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलमध्ये गांगुलीनं ११७ धावांची खेळी केली होती. फायनलमध्ये शतकी खेळी करणाराही तो एकमेव फलंदाज आहे. पण त्याची ही शतकी खेळी व्यर्थच ठरली होती.

भारताचा विद्यमान कोच गौतम गंभीर या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. २०११ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायलमध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याने ९७ धावांची खेळी केली होती.

महेंद्रसिंह धोनीनं २०११ च्या वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध ९१ धावांची खेळी केली होती.

२०२३ च्या हंगामातील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिप स्पर्धेच्या फायलमध्ये अंजिक्य रहाणेनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ८९ धावांची खेळी केली होती.

भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागनं २००३ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८२ धावांची दमदार खेळी केल्याचे पाहायला मिळाले होते.

विराट कोहलीनं २०१४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत ७७ धावांची खेळी केल्याचा रेकॉर्ड आहे.

२०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलमध्ये हार्दिक पांड्याने पाकिस्तान विरुद्धच्या लढतीत ७६ धावांची खेळी केली होती.