Join us  

न्यूझीलंडने इतिहास रचला! राचिन रवींद्र अन् डेव्हॉन कॉवने यांनी विक्रमांचा पाऊस पाडला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2023 9:01 PM

Open in App
1 / 9

राचिनचे वडिल रवी कृष्णमूर्ती हे मुळचे बंगळुरुचे, तर त्याच्या आईचे नाव दीपा कृष्णमूर्ती. बऱ्याच वर्षांपासून ते न्यूझीलंडमध्येच आहेत. राचिनचा जन्मही न्यूझीलंडमधील वेलिंग्टनचा आहे. रवि कृष्णमूर्ती हे बंगळुरू येथील सॉफ्टवेअर सिस्टम आर्किटेक्ट होते. न्यूझीलंडमधील हट हॉक्स क्लबचे संस्थापक रवींद्र यांचे वडील रवी कृष्णमूर्ती १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतातून स्थलांतरित झाले आणि न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले.

2 / 9

कृष्णमूर्ती त्यांच्या कामानिमित्त ९० च्या दशकात न्यूझीलंडला गेले होते. राचिनच्या वडिलांना क्रिकेटमध्ये खूप रस होता आणि त्यांनी वेलिंग्टनमध्ये स्वतःचा क्रिकेट क्लबही सुरू केला होता. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडचे चाहते असलेल्या राचिनच्या वडिलांनी या भारतीय दिग्गजांच्या नावांची अक्षरे मिसळून आपल्या मुलाचे नाव 'राचिन' ठेवले.

3 / 9

राचिन रवींद्रने आज ८२ चेंडूंत शतक झळकावले आणि वर्ल्ड कप स्पर्धेतील न्यूझीलंडकडून नोंदवलेले हे वेगवान शतक ठरले. याच सामन्यात डेव्हॉन कॉनवेने ८३ चेंडूंत शतक झळकावून मार्टीन गुप्तील ( ८८ चेंडू वि. बांगलादेश, २०१५) याचा विक्रम मोडला होता.

4 / 9

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडकडून शतक झळकावणारा राचिन रवींद्र ( २३ वर्ष व ३२१ दिवस) हा युवा फलंदाज ठरला. यापूर्वी हा विक्रम १९९६ मध्ये नॅथन अॅस्टलने ( २४ वर्ष व १५२ दिवस वि. इंग्लंड) आणि ख्रिस हॅरिसने ( २६ वर्ष व ११२ दिवस वि. ऑस्ट्रेलिया) यांच्या नावावर होता.

5 / 9

वर्ल्ड कप स्पर्धेतील पदार्पणाच्या इनिंग्जमध्ये शतक झळकावणारा राचिन रवींद्र हा न्यूझीलंडचा पाचवा फलंदाज ठरला. यापूर्वी ग्लेन टर्नर ( १७१* वि. ईस्ट आफ्रिका, १९७५), स्कॉट स्टायरिस ( १४१ वि. श्रीलंका, २००३), डेव्हॉन कॉनवे ( १४१*** वि. इंग्लंड, २०२३) आणि नॅथन अॅस्टेल ( १०१ वि. इंग्लंड, १९९६) यांनी हा पराक्रम केला आहे.

6 / 9

राचिन व कॉनवे यांनी दुसऱ्या विकेटसाठी २११ चेंडूंत २७३ धावांची विक्रमी भागीदारी केली. न्यूझीलंडकडून भारतातील वर्ल्ड कप स्पर्धेतील ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी १९९६मध्ये एल जेर्मन व ख्रिस हॅरिस यांनी चेन्नईत १६८ धावांची आणि २०११ मध्ये मार्टीन गुप्तील व ब्रेंडन मॅक्युलम यांनी १६६ धावांची भागीदारी केली होती.

7 / 9

भारतात झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेतील ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. २०११मध्ये मोहाली येथे हाशिम आमला व एबी डिव्हिलियर्स यांनी नेदरलँड्सविरुद्ध २२१ धावांची भागीदारी केली होती. त्याआधी १९९६मध्ये मार्क व स्टीव्ह वॉ यांनी विशाखापट्टणम येथे केनियाविरुद्ध २०७ धावा जोडल्या होत्या.

8 / 9

वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडने २८०+ धावांचे लक्ष्य सर्वात कमी षटकांत पार करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आज नोंदवला

9 / 9

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपन्यूझीलंडइंग्लंड