उद्याच्या मॅचवर 'सट्टा' गरम! मॅच कोण जिंकणार पेक्षा, टॉसवर जास्त भाव; किती रन्स करणार त्याचाही अंदाज

ही मॅच पाहण्यासाठी उद्या हॉटस्टारवर देखील सर्व विक्रम मोडले जाण्याची शक्यता आहे. विमानांची भाडी एवढी झालीत की पॅरिस फिरून होईल, असे सांगितले जात आहे.

उद्या वर्ल्डकपची फायनल मॅच भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळविली जाणार आहे. ही मॅच पाहण्यासाठी उद्या हॉटस्टारवर देखील सर्व विक्रम मोडले जाण्याची शक्यता आहे. विमानांची भाडी एवढी झालीत की पॅरिस फिरून होईल, असे सांगितले जात आहे. लाखोंच्या संख्याने चाहते अहमदाबादकडे कूच करत आहेत. असे असताना अनधिकृत असला तरी सट्टा बाजार मागे राहिल कसा? उद्याच्या सामन्यावर प्रत्येक गोष्टींवर सट्टा बाजार गरम झाला आहे.

उद्याची फायनल कोण जिंकणार एवढेच नाही तर टॉस कोण जिंकणार, प्लेईंग इलेव्हन कोण, पॉवर प्लेमध्ये कोणती टीम किती रन्स बनविणार, ५० ओव्हरमध्ये कोणती टीम किती रन्स बनविणार हे सारे अंदाज लावले गेले आहेत. या साऱ्या अंदाजांवरून टीम इंडिया फेव्हरेट असल्याचेच दिसत आहे. परंतू, ऑस्ट्रेलियाला कमी लेखून चालणार नाहीय हे देखील तितकेच खरे आहे.

वर्ल्डकपमधील सर्व मॅचसारखीच या मॅचमध्ये देखील टीम इंडियालाच सट्टेबाजारात जास्त पसंती आहे. ४६-४७ चा भाव मिळत आहे. म्हणजेच जर टीम इंडियाच्या विजयावर एक लाख रुपये लावले आणि जर भारत जिंकला तर ४६००० रुपये मिळणार आहेत. परंतू जर भारत हरला तर १ लाख रुपये सट्टेबाजांना द्यावे लागणार आहेत.

याचबरोबर जर टॉसच्या जय-पराजयावरही भाव आले आहेत. जर एखाद्याने टॉसवर १ लाख रुपये लावले आणि जिंकला तर ९०००० रुपये मिळणार आहेत. परंतू, जर ती टीम टॉस हरली तर त्याच्या खिशातून १ लाख रुपये द्यावे लागणार आहेत.

पॉवर प्लेमध्ये टीम इंडिया ५८ ते ६० रन्स बनवेल असा अंदाज आला आहे. जर एखाद्याने ६० रन्सवर सट्टा खेळला आणि ६० पेक्षा जास्त रन्स बनविले तर तो व्यक्ती जिंकला आणि जर ५९ पेक्षा कमी रन्स बनविले तर बुकी जिंकला. याचप्रमाणे ऑस्ट्रेलियावरही सट्टा लागला आहे. ऑस्ट्रेलिया पॉवर प्लेमध्ये 55-57 रन्स बनविण्याचा अंदाज आहे.

टीम इंडिया ५० ओव्हरमध्ये ३२२-३२६ रन्स बनविण्याचा अंदाज आहे. जर एखाद्याने ३२६ वर सट्टा खेळला व टीमने ३२२ पेक्षा जास्त रन्स मारले तर तो जिंकणार आहे. परंतू, जर टीमने ३२२ पेक्षा कमी रन्स केले तर बुकी जिंकणार आहे.

ऑस्ट्रेलिया टीमने जर पहिली बॅटिंग केली तर ५० ओव्हरमध्ये 286-290 रन्स बनविण्याचा सट्टेबाजाराचा अंदाज आहे.

सध्यातरी कोण शतक मारणार, कोण किती विकेट घेणार यावर भाव आलेले नाहीएत. हे भाव टॉस झाल्यानंतर येतात. तसेच ते मॅचच्या परिस्थितीनुसार बदलत असतात, असे जाणकारांनी सांगितले. ही माहिती एनबीटीने दिली आहे.